AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Job | सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी, महाराष्ट्र शासनासकडून 11 हजार पदांची बंपर भरती जाहीर

महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 11 हजार पदांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ’क’ आणि ‘ड’ गटासाठी ही बंपर भरती असणार असल्याची माहिती मिळत आहे.

Government Job | सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी, महाराष्ट्र शासनासकडून 11 हजार पदांची बंपर भरती जाहीर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 28, 2023 | 6:30 PM
Share

मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, अशी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची इच्छा आहे. अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास करतात. हे विद्यार्थी नोकरीसाठी योग्य भरतीची प्रतिक्षा करतात. त्यानंतर भरती जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करुन नोकरी मिळवतात. राज्यात कोरोना संकट काळात दोन वर्ष कोणतीही भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. पण कोरोना संकटानंतर सातत्याने वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरी जाहीर होत आहे. आतादेखील अशी भरती जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी गृह विभागाकडून पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. तलाठी भरतीच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. राज्यात सध्या तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी परीक्षा घेतली जात आहे. या भरतीसाठी 20 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. स्वत: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून नेमकी घोषणा काय?

राज्यात उद्यापासून आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागात 11 हजार पदांसाठी भरती होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या तरुणांना यासाठी आता चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य विभागात कमी मनुष्यबळ असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. त्यामुळे सातत्याने याबाबतच्या तक्रारी येत होत्या. सरकार आणि आरोग्य विभाग लवकरच यावर तोडगा काढेल, अशी चर्चा होती. अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आरोग्य विभागात आता बंपर भरती होणार आहे. तब्बल 11 हजार पदांसाठी भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.

आरोग्य विभागातील 11 हजार पदांसाठी उद्या आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची देखील निवड होणार आहे. तसेच कर्मचारी वर्गासाठी देखील ही भरती महत्त्वाची ठरणार आहे.

10 हजार 949 पदांची भरती

आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. ही भरती गेल्या 3 वर्षांपासून रखडली होती. पण आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने भरती प्रकियेला सुरुवात झालीय. ’क’ आणि ‘ड’ गटातील एकूण 10 हजार 949 पदांची होणार मेगाभरती होणार आहे.

पेपर फुटीमुळे भरती रखडली

’क’ वर्गातील 55 प्रकारचे विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया 2021 मध्ये सुरू असताना पेपर फुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा आरोग्यमंत्री डॉ सावंत यांच्या पुढाकाराने ही भरती पुन्हा सुरु होणार आहे. TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी