AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stock Market Crash : पहिला दिवसच खराब… शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, दोन मिनिटात अब्जावधी रुपये पाण्यात; काय घडलं?

आज शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. सेन्सेक्स-निफ्टी अवघ्या दोन मिनिटात क्रॅश झाले, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये पाण्यात गेले. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि अमेरिका-इराणमधील तणाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

Stock Market Crash : पहिला दिवसच खराब... शेअर मार्केटमध्ये हाहा:कार, दोन मिनिटात अब्जावधी रुपये पाण्यात; काय घडलं?
Stock Market Crash Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 12:37 PM
Share

शेअर मार्केटमध्ये (Stock Market Crash) पैसा डबल करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आज मोठा झटका लागला आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवातच अत्यंत खराब झाली. सेन्सेक्स-निफ्टी (Sensex-Nifty) दोन्ही इंडेक्स उघडताच अवघ्या दोन मिनिटात क्रॅश झाले. मुंबई शेअर मार्केटमध्ये 30 शेअर असलेला सेन्सेक्स ओपन होताच 850 हून अधिक अंकांनी खाली आला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी इंडेक्स एका झटक्यात 23,000च्या खाली गेला. शेअर मार्केटमध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी हाहा:कार उडाल्याने गुंतवणूकदारांचे अवघ्या दोन मिनिटातच अब्जावधी रुपये पाण्यात गेले.

शेअर मार्केट आज सकाळी उघडताच हाहा:कार उडाला. बीएसईचा सेन्सेक्स शुक्रवारी 73,895 च्या तुलनेत घसरून 73,734 वर उघडला होता. पण अचानक मार्केट कोसळल्यानंतर BSE Sensex 850 हून अधिक अंकांनी खाली कोसळला असून 73,138 च्या लेव्हलला आला आहे.

निफ्टीही धडाम

सेन्सेक्स सारखी अवस्था NSE Niftyचीही होती. हा 50 शेअर असणारा इंडेक्स शुक्रवारी 23,140 वर बंद झाला होता. आज तो 23,065 वर ओपन होताच एका झटक्यात 23,000च्या खाली आला. बातमी येईपर्यंत निफ्टी 271 अंकानी कोसळून 22,869 लेव्हलवर ट्रेड करत होता.

कच्च्या तेलाचा परिणाम

दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. ब्रेंट फ्यूचर्स 2.1 टक्क्याने वाढून 106.49 डॉलर प्रति बॅरलवर गेला आहे. या महिन्यात आतापर्यंत किमतीमध्ये सुमारे 18 टक्क्याने मोठी वाढ झाली आहे. तर अमेरिकेच्या क्रूड फ्यूचर्समध्ये 1.5 टक्क्याने वाढ होऊन 93.84 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या या वाढत्या किमतीचा परिणाम थेट भारतीय बाजारांवर झाला आहे. त्यामुळेच बाजार सुरू होताच अवघ्या दोन मिनिटात म्हणजे 9:17 वाजता सेन्सेक्स 512 अंकाने घसरून 73,383.70 वर आला. ही घसरण एवढ्यावरच थांबली नाही. तर 10:50 वाजता सेन्सेक्स 970 अंकावर जाऊन थांबला. त्यामुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांना त्याचा मोठा फटका बसला. या कंपन्यांचं टोटल मार्केट कॅपिटलायजेशन सुमारे 6 लाख कोटी रुपयाने कमी झालं.

युद्धाचा फटका

शेअर मार्केटमध्ये आलेल्या त्सुनामीमागे वैश्विक तणाव हे मुख्य कारण आहे. अमेरिका आणि इराणच्या दरम्यान शांतता चर्चा अधांतरीच आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज जलडमरूमध्यला पुन्हा उघडण्याचा इराणी प्रस्ताव नाकारला आहे. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, इराण तडजोड करण्यासाठी उतावीळ झाला आहे. तर, हा वाद केवळ कुटनीतीनेच सोडवला जाऊ शकतो, असं इराणचं म्हणणं आहे. फेब्रुवारीत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त हल्ले केले होते. तेव्हापासून मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. युद्धामुळे तेल मार्केटवर अनिश्चिततेचं संकट घोंघावत आहे.

(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी