Government Jobs : असिस्टंट मॅनेजर आणि ज्यूनिअर अकाऊंटंटसह अनेक पदासांठी जाहीरात, लवकर अर्ज करा

| Updated on: Feb 24, 2021 | 3:32 PM

राजस्थान को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड (RCDF)द्वारे असिस्टंट मॅनेजर आणि ज्यूनिअर अकाऊंटटसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Government Jobs : असिस्टंट मॅनेजर आणि ज्यूनिअर अकाऊंटंटसह अनेक पदासांठी जाहीरात, लवकर अर्ज करा
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
Follow us on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. राजस्थान को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड (RCDF)द्वारे असिस्टंट मॅनेजर आणि ज्यूनिअर अकाऊंटटसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत राजस्थानात एकूण 503 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 29 जानेवारी 2021 पासून सुरु झाली आहे.(Recruitment for 503 posts in RCDF)

राजस्थान को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन लिमिटेड (RCDF) कडून जारी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. म्हणजे अर्ज करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. त्यानंतर अर्जासंबंधीची लिंक वेबसाईटवर हटवली जाईळ. या पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करु इच्छित असाल तर तातडीने rajcrb.rajasthan.gov.in या वेबसाईटला भेट द्या.

अर्ज कसा कराल?

या पदांसाठी अर्ज करायचा झाल्यास इंन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)च्या ऑफिशियल वेबसाईट ibps.in वर जावं लागेल. त्यात “Recruitment for various posts in the Rajasthan Cooperative Dairy Federation Ltd. (RCDF)” च्या लिंकवर क्लिक करावं लागेल. आता “Click here for New Registration” वर क्लिक करुन तुमचा मोबाईल नंबर किंवा मेल आयडीच्या मदतीनं रजिस्टर करा. आता तुमच्या नंबरवर एक मेसेज येईल. त्याद्वारे तुम्हाला रजिस्टर नंबर आणि पासवर्ड मिळेल. त्याच्या मदतीनं तुम्ही अर्ज भरु शकता.

अर्जाचे शुल्क

अर्जाचे शुल्क भरल्यानंतरच अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईळ. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल आणि अन्य राज्यांमधील उमेदवारांना 1 हजार 200 रुपये शुल्क आहे. तर राजस्थानमधील आणि OBC/SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 600 रुपये शुल्क आहे. डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येऊ शकते.

कोणत्या पदांसाठी भरती ?

ही भरती प्रक्रिया एकूण 503 पदांसाठी होत आहे. त्यात,

>> प्लँट ऑपरेटर-II  – 77

>> इलेक्ट्रीशियन – 23

>> फिटर – 15

>> वेल्डर – 06

>> डेअरी सुपरवायझर-III- 13

>> व्हिलेज एक्सटेन्शन वर्कर – 20

>> लाईव्ह स्टॉक सुपरवायझर – 07

>> हेल्पर – 27

>> बॉयलर ऑपरेटर 31

>> असिस्टंट मॅनेजर 96

>> ज्यूनिअर अकाऊंटट 48

>> ज्यूनिअर इंजिनिअर – 1

>> लॅब असिस्टंटच्या- 46 पदासांठी ही भरती होत आहे.

संबंधित बातम्या :

NTPC Recruitment 2021 : 1.2 लाखापर्यंत पगार, इंजिनिअर-केमिस्टसाठी 230 पदांवर भरती, ‘असा’ भरा अर्ज

सीडॅक नोएडामध्ये बर्‍याच पदांसाठी नोकरीची संधी; आजच अर्ज करा

Recruitment for 503 posts in RCDF