Paid Internship : 16 दिवस आणि 16 तासांचं काम, 7 लाखांपेक्षा जास्त पगार, कुठे, कसं, कधी कराल अप्लाय ? जाणून घ्या A टू Z माहिती
Paid Internship in World Bank Treasury : अनुभव मिळेल असे सांगत अनेक कंपन्या आजही फ्रीमध्ये इंटर्नशिप करून घेतात. मात्र वर्ल्ड बँकेकडून लाखोंच्या पॅकेजसह इंटर्नशिपची ऑफर देण्यात येत आहे.

कुठेही फुलटाईम जॉब करण्याआधी काम समजून घेण्यासाठी आणि अनुभवासाठी बरेच जम इंटर्नशिप करण्यास प्राधान्य देतात, त्याचा फायदाही होतो म्हणाला. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, काम करायचं आहे तिथला अनुभव तुमच्या गाठीशी येतो आणि मग नव्या जॉबसाठी देखील तुम्ही सज्ज होता. पण बऱ्याच ठिकाणी बिनपगारी इंटर्नशिप दिली जाते, मात्र आजकाल चित्र बदलू लागलं आहे. कारण आजकाल बहुतांश कंपन्या या पेड इंटर्नशिप देतात, म्हमजेच तिथे काम करून तुम्ही अनुभवही मिळवता आणि पैसेही कमावता.
याचसंदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड बँकेने इंटर्नशिपची अशी ऑफर दिली आहे की त्यासाठी लोक नोकरी सोडण्यासही तयार होऊ शकतात. जर तुम्ही फायनान्स, इकॉनॉमिक्स किंवा बिझनेसचे (वित्त, अर्थशास्त्र किंवा व्यवसाय) शिक्षण घेत असाल तर वर्ल्ड बँक ट्रेझरी समर इंटर्नशिप 2026 ही तुमच्यासाठीएक उत्तम संधी आहे. ही इंटर्नशिप वॉशिंग्टन डी.सी. मध्ये एकूण 10 आठवडे चालणार आहे. या काळात, तुम्ही जागतिक बँकेच्या वेगवेगळ्या टीमसोबत काम करू शकाल तसेच जागतिक वित्तव्यवस्थेचे बारकावेही तुम्हाला जाणून घेता येतील. जागतिक बँकेतील इंटर्नशिपचे तपशील treasury.worldbank.org या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही चेक करू शकता.
फक्त 400 तास काम
या इंटर्नशिपदरम्यान कामाचे एकूण तास 400 असतील असे निश्चित करण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, एखाद्याला अंदाजे 16 दिवस आणि 16 तास ऑफिसमध्ये राहावे लागेल. या सर्व कठोर परिश्रमाच्या बदल्यात, तुम्हाला प्रति तास पगार डॉलरमध्ये दिला जाईल. जर आपण त्याचे भारतीय रुपयांत रुपांतर केलं तर या संपूर्ण इंटर्नशिप प्रोग्रॅमदरम्यान तुम्ही 7 लाख ते 8.5 लाख रुपये कमवू शकता. थोडक्यात या इंटर्नशिपमुळे तुम्हाला अनुभव तर मिळेलच पण बँक खातंही मजबूत होईल.
अनेक टीमसोबत काम करण्याची संधी
वर्ल्ड बँकेत इंटर्नशिप करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला फक्त कामच नाही तर खरा अनुभवही मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या विभागांमध्ये 3 आठवड्यांचे रोटेशन मिळेल, जिथे टीम्स ॲसेट मनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट, ऑपरेशन्स , रिस्क आणि कंप्लायन्स सारख्या महत्वाच्या विषयांवर काम करता येईल. प्रत्येक रोटेशननंतर, तुम्हाला तुमच्या टीमसमोर एक प्रेझेंटेशन द्यावे लागेल. शेवटी, संपूर्ण बॅच संयुक्तपणे वर्ल्ड बँकेच्या ट्रेझरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कॅपस्टोन प्रकल्प सादर करेल.
नोकरीचाही पर्याय
इतकंच नाही तर इंटर्नशिप संपल्यानंतर, सर्वात पात्र उमेदवारांना कनिष्ठ विश्लेषक (junior analyst) म्हणून 2 वर्षांच कॉन्ट्रॅक्टही मिळू शकतं. याचा अर्थ असा की तुमचं शिक्षण, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर लगेचच तुम्हाला जागतिक बँकेसारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर, ही इंटर्नशिप केवळ शिकण्याचा एक उत्तम मार्ग नाही तर त्यामुळे तुमच्या करिअरला उत्तम सुरूवात मिळू शकते.
वर्ल्ड बँक इंटर्नशिप प्रोग्राम स्ट्रक्चर
अवधी: 10 आठवडे 26 मे ते 3 ऑगस्ट 2026
रोटेशन : 3 x 3 आठवड्यांचा टीम अनुभव, प्रत्येक रोटेशनचा शेवट एका प्रेझेंटेशनने होईल; अंतिम प्रेझेंटेनशन हे 3 ऑगस्ट रोजी कॅपस्टोन प्रेझेंटेशन असेल.
वर्ल्ड बँक इंटर्नशिप पगार आणि फायदे
अमेरिकन नागरिक नसलेले: 21.80 डॉल्रस प्रतितास, ≈ 1800 रुपये प्रतितास
अमेरिकन नागरिक: 26.20 डॉलर्स प्रति तास (एकूण) ≈ 2160 रुपये प्रतितास
एकूण कमाई: 400 तास × 1800 रुपये = 7.3 लाख; तर 2,160 असल्यास = 8.46 लाख रुपये , अंदाजे 7.5 लाखल रुपये
लाभ: World Bank तर्फे लॅपटॉप, व्हिसा स्पॉन्सरशिप, ऑफिसमध्ये कमीत कमी 4 दिवस उपस्थिती अनिवार्य
वर्ल्ड बँकमधील इंटर्नशिपाठी कसा कराल अर्ज ?
चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या (वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय) शेवटच्या वर्षातील विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. त्यांचा पदवी अभ्यासक्रम डिसेंबर 2026-सप्टेंबर 2027 मध्ये पूर्ण झाला पाहिजे. उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असावा. वर्ल्ड बँकेतील तुमच्या इंटर्नशिप दरम्यान, तुम्ही अमेरिकेत पूर्णवेळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही इतर कोणतीही नोकरी किंवा इंटर्नशिप करू शकत नाही.
अर्ज : कव्हर लेटर + रेझ्युमे (PDF), वैकल्पिक डायवर्सिटी/पर्सनल स्टेटमेंट. इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
