Hingoli Jobs : थेट मुलाखतीला जायचं ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगारपाणी सगळं एका क्लिकवर

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 38 वर्षे असावं. नोकरीचे ठिकाण हिंगोली असणार आहे. या पदांसाठी जर एमबीबीएस उमेदवार उपलब्ध झाले नाही आणि पदं रिक्त राहिल्यास त्या जागी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून ही रिक्त पदं भरण्यात यावीत अशा शासनाच्या सूचना आहेत. इतर नियम व अटी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत.

Hingoli Jobs : थेट मुलाखतीला जायचं ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगारपाणी सगळं एका क्लिकवर
थेट मुलाखतीला जायचं !
Image Credit source: facebook
रचना भोंडवे

|

May 10, 2022 | 8:38 AM

हिंगोली : जिल्हा निवड समिती, हिंगोली (Hingoli)अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट- अ या पदावर कंत्राटी पद्धतीने (On Contract Basis) भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एमबीबीएस (MBBS)आणि विशेषज्ञ (पदव्युत्तर पदवी/ पदविका) अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 13 मे 2022 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचं कमाल वय 38 वर्षे असावं. नोकरीचे ठिकाण हिंगोली असणार आहे. या पदांसाठी जर एमबीबीएस उमेदवार उपलब्ध झाले नाही आणि पदं रिक्त राहिल्यास त्या जागी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून ही रिक्त पदं भरण्यात यावीत अशा शासनाच्या सूचना आहेत. इतर नियम व अटी जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत.

  1. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी गट – अ ( या पदावर कंत्राटी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी)
  2. रिक्त पदे – 07 पदे
  3. नोकरी ठिकाण – हिंगोली
  4. निवड प्रक्रिया – मुलाखत
  5. मुलाखतीची तारीख – 13 मे 2022
  6. मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सहकारी सवाखाना, तोफखाना, हिंगोली.
  7. कमाल वय – 38 वर्षे

शैक्षणिक पात्रता आणि वेतन

एमबीबीएस – 75,000/- रुपये प्रति महिना

एमबीबीएस पदव्युत्तर पदवी /पदविका – 85,000/- रुपये प्रति महिना

महत्त्वाचे

Notification – Click Here

Official Website – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें