IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सलन सिलेक्शनद्वारे (IBPS) भरण्यात येणाऱ्या क्लार्क आणि PO पदांच्या जागांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!
आरआरबी पीओ भरती परीक्षेचा निकाल जाहीर
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 12:32 PM

IBPS RRB Recruitment 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सलन सिलेक्शनद्वारे (IBPS) भरण्यात येणाऱ्या क्लार्क आणि PO पदांच्या जागांसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. RRB क्लार्क आणि ऑफिसर स्केल 1,2,3 या पदांसाठी IBPS ची वेबसाईट ibps.in वर तुम्ही ऑनलाईन अर्ज करता येईल. (IBPS RRB Recruitment 2021 all about to know bank job today in last day for registration)

तब्बल 12097 पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी तरुणांकडे आहे. ज्यांचं बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न आहे, अशा तरुणांचं स्वप्न साकार होऊ शकतं.

परीक्षांचं नियोजन

ही भरती देशभरात करण्यात येणार आहे. या पदांसाठी IBPS 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत पूर्व परीक्षा (Pre Exam) आयोजित करणार आहे. या परीक्षेसाठी 07 जून रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं.

या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना विभागीय ग्रामीण बँकांमध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाईटवर जाऊन आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन IBPS कडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु – 08 जून, 2021

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 जून, 2021

Pre Exam लेटर डाऊनलोड – 09 जुलै 2021

Pre Exam ट्रेनिंग – 19 जुलै 2021 ते 25 जुलै 2021

IBPS RRB Pre Exam (ऑफिसर स्केल- I आणि ऑफिस असिस्टेंट) – 01, 07, 08, 14, 21 ऑगस्ट 2021

ऑनलाईन Pre Exam निकाल – सप्टेंबर 2021

अर्ज करण्याची प्रक्रिया

– सर्वात आधी ibps.in या वेबसाईटला भेट द्या – होम पेजवर CRP RRBs वर क्लिक करा – Common Recruitment Process- Regional Rural Banks Phase X यावर क्लिक करा – त्यानंतर Click Here to apply Online वर क्लिक करा – इथे संबंधित पोस्टवर क्लिक करा – त्यानंतर पुढील पेजवर Click here for New Registration वर क्लि करा – रजिस्ट्रेशननंतर Application Form भरा – अॅप्लिकेशन फॉर्मची प्रिंट जरुर घ्या

अर्ज करण्यासाठी जनरल कॅटेगरीतील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी वर्गासाठी हे शुल्क 175 रुपये आहे.

शैक्षणिक पात्रता

ऑफिसर स्केल 2 यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50 टक्क्यांसह पदवीधर असावा. कोणत्याही विषयातील पदवी ग्राह्य असेल.

PO इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन किंवा कम्प्युटर सायन्स क्षेत्रातील पदवी आणि किमान वर्षभराचा अनुभव आवश्यक

ऑफिसर स्केल 2 चार्टर्ड अकाऊंटट पदासाठी उमेदवार CA परीक्षा पास असणे अनिवार्य आहे.

संबंधित बातम्या  

Job News: भारतीय तटरक्षक दलामध्ये 50 जागांवर भरती, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

Job News:मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त, अधिष्ठाता संवर्गासाठी पदभरती, MPSC द्वारे होणार प्रक्रिया

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.