AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IDBI Bank Recruitment 2021: आयडीबीआय बँकेत 650 जागांवर बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी

आयडीबीआय बँकेने असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 650 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

IDBI Bank Recruitment 2021: आयडीबीआय बँकेत 650 जागांवर बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी
आयडीबीआय बँक
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 12, 2021 | 8:56 AM
Share

नवी दिल्ली: आयडीबीआय बँकेने असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत एकूण 650 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

पदांची संख्या

आयडीबीआय बँकेकडून एकूण 650 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 22 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

आयडीबीआय बँकेने एका वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स यासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये नऊ महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. तर, तीन महिने इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे. हा डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून प्रमाणपत्र दिले जाईल आणि आयडीबीआय बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल. हे उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता यावर आधारित असेल.

पात्रता

अर्ज करणारा उमेदवार हा भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर झालेला असावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट 55 टक्के निश्चित करण्यात आलीय. उमेदवाराचे वय 21 ते 28 च्या दरम्यान असावं.

अर्जाचे शुल्क

आयडीबीआय बँकेने एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.

कार्यकारी पदाच्या 920 जागांवर भरती

आयडीबीआय बँकेने 2021 मधील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑगस्ट पासून झाली असून अखेरचा दिवस 18 ऑगस्ट आहे. 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

एक वर्षाच्या करारावर नेमणूक

पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

इतर बातम्या:

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला

IDBI Bank Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत 920 जागांसाठी भरती, 29 हजारापर्यंत पगार मिळणार

IDBI bank invites application for 650 post of Assistant Manager Grade A post check details here

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?