वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला

नागपूर पोलिसांच्या या ई चालानला साधारण दीड लाख पेक्षा जास्त वाहनचालकांनी केराची टोपली दाखवलीय.

वाहतूक पोलिसांच्या ई- चालानचा धाक कमी? दीड लाख वाहनचालकांनी दंड थकवला
ई-चालान
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 11:43 AM

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॅाच आहे. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांचे फोटो सीसीटीव्हीत कैद झाले की लगेच वाहनचालकांच्या मोबाईलवर ई चालान पाठवाला जातो. पण, नागपूर पोलिसांच्या या ई चालानला साधारण दीड लाख पेक्षा जास्त वाहनचालकांनी केराची टोपली दाखवलीय.

30 टक्के वाहनचालकांनी ई चालानचं शुल्क थकवलं

नागपूर शहरात साधारण ३० टक्के ई चालान भरलेच नाही. ई चालानची थकीत रक्कम सात कोटींच्या आसपास आहे. थकीत दंड वसूल करण्यासाठी आणि बेलगाम वाहनचालकांवर कारवाईसाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी स्मार्ट नाकाबंदी लावलीय. या स्मार्ट नाकाबंदीतून पाच महिन्यात 5 कोटी 70 लांकांचा दंड वसूल झालाय. पण अद्याप साधारण 30 टक्के वाहनचालकांनी ई चालान भरलाच नाही. त्यामुळे बेलगाम वाहनचालकांना ई चालानचा धाक नाही का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जातोय.

नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या वतीनं चालानचं शुल्क भरण्याचं आवाहन

नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे डीसीपी सारंग आव्हाडे यांनी वाहन धारकांना शुल्क भरण्याचं आवाहन केलंय.

नागूपर पोलिसांच्या कारवाईकडं लक्ष

ई-चालानची रक्कम थकवणाऱ्या वाहनधारकांविरोधात वाहतूक पोलीस कठोर कारवाई करणार याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. नागपूर पोलिसांसमोर ई-चालानचा दंड वसूल करणे आणि नागपूरमधील वाहनधारकांना शिस्त लावण्याचं आव्हान निर्माण झालाय.

उमरेडमध्ये दरोड्याचा प्रयत्न फसला

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात दरोड्याचा प्रयत्न फसलाय. उमरेडच्या सिंधी कॉलनीत महेश तोलानी यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरच्यांना जाग आली आणि आरडाओरड केल्यानं दरोडेखोर पळून गेले. पोलिसांना तातडीनं घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. मात्र, अद्यापपर्यंत दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. मात्र, यामुळं उमरेड मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. दरोड्याचा हा प्रयत्न सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.

इतर बातम्या:

VIDEO: ओबीसींच्या 36 वसतिगृहांचं काय झालं?; ओबीसी महासंघाचा पटोले, वडेट्टीवारांना सवाल

पोलिसांच्या मारहाणीनंतर नागपुरात तरुणाची आत्महत्या, गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी

नागपूरात ड्रोनच्या सहाय्याने सीड बॉलची पेरणी, नरखेडमधील वन क्षेत्रात वृक्षारोपणाचा अत्याधुनिक प्रयोग

Nagpur 30 percent vehicle owners not pay E Chalan amount fine by traffic police

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.