Indian Navy MR Recruitment : भारतीय नौदलात 350 नाविकांची भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी

इच्छुक आणि पात्र उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइट, joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतील.

Indian Navy MR Recruitment : भारतीय नौदलात 350 नाविकांची भरती, दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना मोठी संधी
indian navy
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 1:11 PM

Indian Navy MR Recruitment नवी दिल्ली: भारतीय नौदलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये नाविकांच्या 350 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकताता. भारतीय नौदलाची वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट देऊन अर्ज दाखल करता येतील. उमेदवारांना भारतीय नौदलाच्या वेबसाईटवर 23 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

नाविक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक म्हणजेच दहावी परीक्षा उत्तीर्ण केली असलेली पाहिजे. तसेच, उमेदवारांचा जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान असावा.

उमेदवारांची निवड कशी होणार?

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व पीएफटी म्हणजेच शारिरीक क्षमता चाचणीद्वारे होईल. लेखी परीक्षा आणि पीएफटीसाठी उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीतील गुणांची पातळी वेगळ्या राज्यांसाठी वेगवगेळी असू शकते. कारण रिक्त जागा राज्यानुसार निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कुक, स्टीवार्ड आणि हायजिनिस्ट या पदांवर काम करावं लागणार आहे.

अर्ज कसा दाखल करावा

  1. भारतीय नौदलाची वेबसाईट joinindiannavy.gov.in वर भेट द्या.
  2. वेबसाईटवर तुमच्या नावाची नोंदणी करा.
  3. नोंदणी करण्यासाठी तुमचा ईमेल आयडी वापरा.
  4. लॉगिन केल्यानंतर current opportunities वर क्लिक करा.
  5. त्यानंतर Apply बटनावर क्लिक करा आणि पोस्ट सिलेक्ट करा.
  6. संपूर्ण अर्ज भरुन कागदपत्रे सादर करा आणि अर्जाच शुल्क भरुन अर्ज जमा करा.
  7. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रत डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट सोबत ठेवा.

1750 उमेदवारांना लेखी परीक्षेला बोलावलं जाण्याची शक्यता

भारतीय नौदलातील कुक (शेफ),स्टीवार्ड आणि हायजिनिस्ट पदासाठी एकूण 1750 उमेदवारांना गुणवत्ता यादी तयार करुन लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामधून उमेदवारांची निवड केली जाईल.

23 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी 

भारतीय नौदलातील नाविक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मदत 23 जुलै आहे. पात्र उमदेवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांकडे त्यांची दहावीची कागदपत्रे असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

ICAR Recruitment 2021: यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी ICARमध्ये भरती, 20 जुलैपर्यंत करा अर्ज

Indian Army Recruitment 2021: महिला सैन्य पोलिसात 100 पदांची भरती, 20 जुलैपर्यंत करा अर्ज

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.