Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात परीक्षेशिवाय SSC अधिकारी होण्याची संधी, वाचा सविस्तर

भारतीय नौदलानं शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलात परीक्षेशिवाय SSC अधिकारी होण्याची संधी, वाचा सविस्तर
प्रतिकात्मक फोटो

Indian Navy Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय नौदलानं शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. एक्झिक्युटिव्ह, टेक्निकल आणि शिक्षण ब्रँचमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ऑफिसर भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज दाखल करण्यास कधीपासून सुरुवात?

भारतीय नौदलानं शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर भरतीसाठी अर्ज दाखल करण्यास 18 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं जाहीर केलं आहे.या भरती प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना 22 जूनपासून सुरु होणाऱ्या इंडियन नावल अकादमी एझिमाला केरळ मधील बॅचमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

पदांचा तपशील

कार्यकारी शाखेत विविध पदांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. सामान्य सेवा [जीएस (माजी)] / हायड्रो केडरमध्ये 45 जागा, एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) साठी 04 जागा, ऑब्झर्व्हरसाठी 08 जागा, पायलटसाठी 15 जागा, लॉजिस्टिक्ससाठी 18 जागा निश्चित कऱण्यात आल्या आहेत.

टेक्निकल ब्रांचमध्ये इंजिनिअरिंग शाखेसाठी (सामान्य सेवा) 27 पदे, इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा)साठी 34 पदे तर नेव्हल आर्किटेक्ट (एनए) – 12 पदे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षण शाखेतून 18 पद भरली जाणार आहेत.

वयोमर्यादा:

भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स भरतीसाठी महिला आणि पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात. शिक्षण आणि तांत्रिक शाखेसाठी अर्जदारांचा जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 दरम्यान असावा. तर 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2001 आणि 02 जुलै 1998 ते 01 जुलै 2003 दरम्यान जन्मलेल्या कार्यकारी शाखेचे उमेदवार अर्ज करू शकतात. पदनिहाय शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी नोटिफिकेशन पाहण्याचं आवाहन करण्यात आलंय. कार्यकारी शाखेतील ऑफिसर पदासाठी विद्यार्थ्याचं अभियांत्रिकीचं पदवीचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. तर, शिक्षण ब्रँचसाठी एमएससी प्रथम श्रेणीतून आणि एम ए इतिहास 55 गुणांसह, तर बी टेक आणि बीई डिग्री असलेल्या उमेदावारांनी 60 टक्के गुण मिळवेलेले असणं आवश्यक आहे.

एसएसबी द्वारे मुलाखत होणार

इंडियन नेव्हीद्वारे अर्जांचीछाननी आणि गुणवत्ता यादी उमेदवारांनी 5 व्या सेमिस्टरपर्यंत पदवीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवर तयार करण्यात येईल. यानंतर एसएसबी मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल किंवा एसएमएसद्वारे आवश्यक माहिती दिली जाईल. स्टाफ सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीत यशस्वी ठरलेल्या निवडक उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाईल. SSB मधील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

इतर बातम्या:

SSC CGL 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, उत्तरतालिका प्रसिद्ध

Oil India Limited Recruitment 2021: ऑईल इंडियामध्ये 535 पदांसाठी भरती, 47 हजारांपर्यंत पगाराची संधी

CDAC Recruitment 2021: सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

 Indian Navy Recruitment 2021 invites application for Officer post in various branches check details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI