ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. या विभागात चालक, कुक, फायरमन आणि केटरिंग असिस्टंट पदांवर भरती होणार आहे.

ISRO LPSC Recruitment 2021: इस्त्रो एलपीएससीमध्ये विविध पदांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या लिक्विड प्रोप्युलशन सिस्टीम सेंटरमध्ये विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. या विभागात चालक, कुक, फायरमन आणि केटरिंग असिस्टंट पदांवर भरती होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात. 24 ऑगस्टपासून अर्ज उपलब्ध होणार असून अर्ज सादर करण्याची मुदत 6 सप्टेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज कुठे करायचा?

पात्र उमेदवार लिक्विड प्रोप्युलशन सिस्टिम सेंटरच्या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. या भरतीप्रक्रियेअंतर्गत एकूण 8 जागा भरल्या जाणार आहेत. lpsc.gov.in या वेबसाईटवर 24 ऑगस्टपासून अर्ज दाखल करता येणार आहे.

पदांचा तपशील

हेवी व्हेईकल ड्रायव्हर: 2 जागा
लाईट व्हेईकल ड्रायव्हर: 2 जागा
कुक: 1 जागा
फायरमन: 2 जागा
केटरिंग अटेंडंट: 1 जागा

पात्रता:

या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षणाची अट दहावी उत्तीर्ण अशी ठेवण्यात आली आहे. तर, फायरमन आणि केटरिंग अटेंडंड या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 25 तर इतर पदांसाठी वयोमर्यादा 35 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

अकोला जिल्हा बँकेत क्लार्क भरती

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्याकडून बँकेसाठी कनिष्ठ लिपीक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 100 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे.

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अकोला मधील कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे. तर, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 21-30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

NIOT Recruitment 2021: राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत 237 पदांवर भरती,78 हजारांपर्यंत पगाराची संधी

PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार

ISRO LPSC Recruitment 2021 application invited in ISRO Liquid Propulsion Systems Centre for 10th pass students

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI