NIOT Recruitment 2021: राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत 237 पदांवर भरती,78 हजारांपर्यंत पगाराची संधी

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीनंप्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक आदी पदांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 237 पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

NIOT Recruitment 2021: राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत 237 पदांवर भरती,78 हजारांपर्यंत पगाराची संधी
NIOT Recruitment

NIOT Recruitment 2021नवी दिल्ली: नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीनंप्रकल्प शास्त्रज्ञ, प्रकल्प तंत्रज्ञ, संशोधक आदी पदांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण 237 पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बी.टेक, एम.एससी आणि दहावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्यासाठी पात्र उमेदवारांनी एनआयओटी च्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

NIOT मधील पदांसाठी अर्ज कसा करावा?

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीनं त्यांच्या वेबसाईटवर यासंदर्भात सविस्तर नोटिफिकेशन जारी केलं आहे. पात्र उमेदवार https://www.niot.res.in/niot1/recruitment.php या वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यास 20 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. तर, अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिनांक 13 सप्टेंबर आहे.

पदांचा तपशील

प्रकल्प शास्त्रज्ञ 04, प्रकल्प शास्त्रज्ञ ग्रेडII 30 पदं, प्रोजेक्ट सांयटिस्ट ग्रेड 1 या पदावर 73 पदांवर भरती होईल. प्रकल्प सहायक या पदासाठी 64 पद ठेवण्यात आली आहेत. प्रोजेक्ट तंत्रज्ञ पदासाठी 28, प्रोजेक्ट ज्युनिअर असिस्टंट 25, रिसर्च असोसिएट 3, सिनियर रिसर्च फेलोसाठी 8 तर ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी 2 पदांवर भरती आयोजित केली जाणार आहे. तर, या पदांसाठी पदनिहाय मानधन दिलं जाणार आहे. 17 हजारांपासून 78 हजारांपर्यंत वेतन दिलं जाणार आहे. पदांनुसार वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून आरक्षणाच्या नियमाप्रमाणं राखीव जागांवरील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

निवड प्रक्रिया

नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीतर्फे प्रोजेक्ट सांयटिस्ट आणि रिसर्च फेलो या पदासांठीचीउमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. तर, इतर पदासांठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट घेतली जाईल. त्यातून उमेदवारांची निवड करण्यात येईल. पात्र उमेदवारांची निवड ही कंत्राटी तत्वावर केली जाणार आहे.

अर्ज कसा दाखल करायचा?

स्टेप 1: नॅशनल इन्स्टिट्यूट ओसियन टेक्नॉलॉजीच्या वेबसाईटला भेट द्या
स्टेप 2: भरती म्हणजेच Recruitment लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: वेबसाईटवरील दिलेल्या सूचना वाचून अर्ज दाखल करा
स्टेप 4: अर्ज दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट सोबत ठेवा
स्टेप 5: एनआयओटीच्या पुढील अपडेटस साठी वेबसाईटला भेट देत राहा.

इतर बातम्या:

PGCIL Apprentice Recruitment 2021: पॉवरग्रीडमध्ये 1110 पदांवर अप्रेटिंसची संधी, अर्ज करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक

BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी , जीडी कॉन्स्टेबलच्या 269 पदांवर भरती

NIOT Recruitment 2021 National Institute of Ocean Technology invites application for 237 post check details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI