Job Alert : ITI पास असणाऱ्या तरूणांसाठी सुवर्णसंधी, थेट IRCTC मध्ये मिळणार सरकारी नोकरी!

IRCTC Recruitment 2023 : इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, (IRCTC) ने अॅप्रेंस्टिस ट्रेनी या पदासाठी अर्ज मागवले आहेत.

Job Alert : ITI पास असणाऱ्या तरूणांसाठी सुवर्णसंधी, थेट IRCTC मध्ये मिळणार सरकारी नोकरी!
indian-railway
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 23, 2023 | 12:02 AM

नवी दिल्ली :  इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड, (IRCTC) ने अॅप्रेंस्टिस ट्रेनी या पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदासाठी योग्य असणाऱ्या उमेदवारांना IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. irctc.com वर ऑनलाइन अर्ज करुन या भर्ती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

14 जून पासून अर्ज घ्यायला सुरू होणार असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 असणार जून आहे. कम्प्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टेंट (COPA) या पदाच्या 25 जागा आहेत. या जॉबसाठी बोर्ड परीक्षेमध्ये कमीत कमी 50 टक्के गुण असायला हवेत आणि त्यासोबतच COPA ट्रेड मध्ये व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेचं ITI चं प्रमाणपत्र असणारा कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.

सविस्तर माहितीसाठी लिंक :  IRCTC Recruitment 2023 Notification

या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचं वय 1 जून 2023 म्हणजेच 15 वर्षे ते 25 वर्षे असायला हवं. कॅटॅगिरीमध्ये असलल्या उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सुट देण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकृत माहितीसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहिती घ्या. या जॉबसाठी उमेदवारांची निवड ही त्यांना असलेल्या मार्कांवर अवलंबून असणार आहे. यासाठी वेगळी कोणती तोंडी परीक्षा किंवा लेखी परीक्षा होणार नाही. फक्त सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी एकदम निष्पक्ष होणार आहे.

दरम्यान, तरुणांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चढाओढ असतेच, यातच आता ITI पास झालेल्या तरुणांसाठी IRCTC मध्ये नोकरी संधी चालून आलीये.