AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jobs in Hotels : कसे बनाल 5 स्टार हॉटेलचे शेफ ? कोणता कोर्स कराल, सॅलरी किती असते ? जाणून घ्या सर्वकाही

फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ बनण्यासाठी क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, आणि बिझनेस स्किल यासोबत स्वयंपाकाची आवड असणे अत्यंत महत्वाचे असते. शेफ बनण्यासाठी एखादे कॉलेज किंवा इन्स्टिटयूटमधून ट्रेनिंग घ्यावे लागते. यासाठी हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करू शकता.

Jobs in Hotels : कसे बनाल 5 स्टार हॉटेलचे शेफ ? कोणता कोर्स कराल, सॅलरी किती असते ? जाणून घ्या सर्वकाही
Image Credit source: freepik
| Updated on: Jun 22, 2023 | 5:06 PM
Share

Jobs in Hotels : अन्न हे पूर्णब्रह्म… आपण असे म्हणतो. अन्न (food) ही प्राथमिक गरज आहे. विविध पदार्थ खायची सर्वांनाच आवड असते. तर काहींना विविध पदार्थ बनवण्याची, ते इतरांना खिलवण्याची आवड असते. तुम्हालाही स्वयंपाकाची आवड असेल तर तुम्ही ती आवड प्रोफेशनमध्येही बदलू शकता. शेफ (chef) बनून तुम्ही तुमची आवडही जोपासू शकता आणि अर्थार्जनही करू शकता.

पण फक्त अन्न पदार्थ बनवणे एवढेच शेफचे काम नाही तर तो मेनू तयार करणे, खाद्यपदार्थांची चाचणी करणे आणि किचन मॅनेजमेंट अशा अनेक जबाबदाऱ्याही सांभाळत असतो. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वेगाने वाढत असून, त्याच पार्श्वभबूमीवर व्यावसायिक शेफ्सची मागणीही वाढत चालली आहे. शेफला एक उत्तम पगाराचे पॅकेजही मिळते. मात्र ते त्याला किती वर्षांचा अनुभव आहे आणि त्याच्याकडे किती कौशल्य आहे, यावर अवलंबून असते.

5 स्टार हॉटेलमध्ये शेफ कसे बनतात, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम, कोर्स असतो आणि त्यांना किती पगार मिळतो हे सर्व आपण जाणून घेऊया,

शेफ बनण्यासाठी काय करावे ?

आजचा काळ हा सर्वत्र व्यावसायिकतेचा आहे. त्यामुळे शेफ बनण्यासाठीही प्रोफेशनल क्वॉलिफिकेशनची गरज असते. यासाठी हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्टिफिकेट, डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस करू शकतो. तसेच यामध्ये बीएससी इन हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी इन केटरिंग सायन्स आणि हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोडक्शन आणि पॅटिसरीमध्ये सर्टिफिकेट कोर्स, कलिनरी आर्ट्समध्ये डिप्लोमा , बीए इन कलरी आर्ट्स इत्यादी कोर्सेसचा समावेशही आहे. या सर्व कोर्सेसचा कालावधी सहा महिने ते तीन ते चार वर्ष इतका असतो.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी काही उत्तम विद्यापीठे

1) आय एच एम ( इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट) (IHM), केटरिंग अँज न्यूट्रीशन पूसा, नवी दिल्ली

2) गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, देहरादून

3) GIHMCT, नागपूर

4) डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, चंदीगडचे

5) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, जयपूर.

प्रवेशासाठी द्यावी लागते एन्ट्रन्स एक्झाम

सरकारी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी एनटीए (NTA) म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही संयुक्त प्रवेश परीक्षा असते. नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट एक्झाम (NCHM) असे या परीक्षेचे नाव आहे. याद्वारे नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (NCHMCT) शी संलग्न महाविद्यालयांमध्ये B.Sc (हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण सहा सेमिस्टर असतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातर्फे या अभ्यासक्रमाची डिग्री मिळते.

किती असते शेफची सॅलरी ?

Glassdoor या अमेरिकन रिव्ह्यू वेबसाइट नुसार, दिल्लीतील 5 स्टार हॉटेल्समध्ये शेफचा सरासरी पगार वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत असतो. मात्र हे सर्व शेफची क्षमता, त्याची कौशल्ये आणि त्याचा अनुभव किती आहे यावर अवलंबून असते. जेवढा अनुभव आणि कौशल्य जास्त, पगारही तितका वाढत जातो.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.