CISF मध्ये नोकरी करणार का? चांगला पगार, 10 वी पास असणाऱ्यांना संधी! वाचा नोटिफिकेशन

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.

CISF मध्ये नोकरी करणार का? चांगला पगार, 10 वी पास असणाऱ्यांना संधी! वाचा नोटिफिकेशन
CISF Recruitment 2023Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 1:11 PM

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ते या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवार cisf.gov.in CISF च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून ती 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत 451 पदांवर युवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यापैकी 183 पदे कॉन्स्टेबल/ड्रायव्हरची असतील, तर 268 पदे कॉन्स्टेबल (ड्रायव्हरलेस पंप ऑपरेटर) ची असतील. या तरुणांना दरमहा 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाणार आहे.

वयोमर्यादा : CISF मध्ये भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे असावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे, तर एससी-एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : CISF मध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक शिक्षित उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करावा?

  • CISF मधील कॉन्स्टेबल रिक्त जागांसाठी cisfrectt.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • आता लॉगिन लिंकवर क्लिक करा
  • स्वत: नोंदणी करा आणि नंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा
  • अर्जाची प्रिंटआऊट घ्या

अर्ज शुल्क किती आहे?

  • जनरल, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
  • SC,ST प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

या नोटिफिकेशनवर क्लिक करा- CISF Recruitment 2023 Official Notification

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.