देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी, एप्रिल-जूनदरम्यान दोन लाख जागा रिक्त

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 29, 2021 | 3:09 PM

30.8 मिलियन लोक नऊ क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवा यांचा समावेश आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक रिक्त जागा उत्पादन क्षेत्रात आहेत.

देशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची संधी, एप्रिल-जूनदरम्यान दोन लाख जागा रिक्त
Follow us

नवी दिल्लीः देशात वाढत्या बेरोजगारीची चर्चा सुरू आहे. परंतु बेरोजगारीबरोबरच देशातील अनेक क्षेत्रांमध्ये लाखो जागा रिक्त आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या नऊ क्षेत्रांमध्ये 187,062 पदे रिक्त राहिलीत. नवीन त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) मध्ये हे समोर आलेय. सर्वेक्षणात कुशल लोकांच्या अभावाबरोबरच अनेक गोष्टींना याचे कारण सांगितले गेलेय. रिक्ततेचा हा आकडा या कंपन्यांचा एप्रिल-जूनपर्यंत दिलेल्या एकूण नोकऱ्यांच्या 0.6 टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे.

ती नऊ क्षेत्रे कोणती आहेत?

30.8 मिलियन लोक नऊ क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवा यांचा समावेश आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक रिक्त जागा उत्पादन क्षेत्रात आहेत. उत्पादन क्षेत्रात 99,429 नोकऱ्या होत्या, ज्या या काळात भरल्या जाणार होत्या. उत्पादन क्षेत्रात 4.5 टक्के आस्थापनांमध्ये रिक्त जागा आल्यात. आयटी/बीपीओमध्येही याच काळात रिक्त असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण आहे. आकडेवारीने या क्षेत्रातील केवळ 2,793 कंपन्यांमध्ये रिक्त जागा दर्शविल्या. रिक्त होण्यामागील कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचा राजीनामा, सेवानिवृत्ती आणि कुशल कर्मचाऱ्यांची उपलब्धता, कुशल कामगारांची अनुपलब्धता ही 39 टक्क्यांहून अधिक रिक्त जागांचे कारण होते.

कुशल कामगारांच्या कमतरतेचे मुख्य कारण

सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, 18 टक्के कंपन्या अधिकृत कौशल्य विकास कार्यक्रम देतात. हे मुख्यतः त्यांचे स्वतःचे कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केले जातात. आयटी/बीपीओ क्षेत्रात सर्वाधिक प्रशिक्षण देणाऱ्या कंपन्या आहेत (29.8 टक्के). त्यानंतर वित्तीय सेवा (22.6 टक्के) आणि शिक्षण (21.1 टक्के) आहे. बांधकाम क्षेत्रातील रिक्त पदांसाठी कुशल कामगारांची कमतरता हे एक प्रमुख कारण होते. या क्षेत्रातील 94.8 टक्के रिक्त पदांसाठी हे जबाबदार होते. बीपीओ क्षेत्रातील कुशल कर्मचाऱ्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाहीत. व्यापार आणि उत्पादन क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता देखील मोठ्या संख्येने रिक्त पदांसाठी कारणीभूत होती. राजीनामा आणि सेवानिवृत्तीपेक्षा हे खूप मोठे कारण आहे. शिक्षण आणि वाहतूक क्षेत्रातील बहुतेक रिक्त पदे वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीमुळे होती. दुसरीकडे आरोग्य आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील रिक्त पदांसाठी राजीनामे ही सर्वात मोठी कारणे आहेत.

संबंधित बातम्या 

बनावट सिमद्वारे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते, हे टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

इंडसइंड बँकेने विस्तारा विमान कंपनीसोबत सुरू केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड, ग्राहकांना या सुविधा मिळतील मोफत

Large number of job opportunities in the country, two lakh vacancies during April-June

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI