Recruitment 2021 | Loksabha मध्ये अनेक पदांसाठी भरती, कसा करता येईल अर्ज

Recruitment 2021 | Loksabha मध्ये अनेक पदांसाठी भरती, कसा करता येईल अर्ज
कोरोना संकटातही असूनही एप्रिल-जून दरम्यान तीन आयटी कंपन्यांनी केली 41000 हायरिंग

येत्या 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. (Lok Sabha Secretariat Recruitment 2021)

Namrata Patil

|

Jan 27, 2021 | 9:16 PM

Lok Sabha Secretariat Recruitment 2021 नवी दिल्ली : लोकसभा सचिवालयात अनेक पदांसाठी भरती निघाली आहे. यात प्रमुख सल्लागार, सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार), सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार), ग्राफिक डिझायनर, वरिष्ठ सामग्री लेखक (हिंदी), कनिष्ठ सामग्री लेखक (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) यांचा पदांचा समावेश आहे. येत्या 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. http://loksabhadocs.nic.in/JRCell/Module/Notice/Consultants_Advertisement.pdf या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करु शकता. (Lok Sabha Secretariat Recruitment 2021)

लोकसभा सचिवालयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

लोकसभा सचिवालयने दिलेल्या माहितीनुसार, प्रमुख सल्लागार, सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार), सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार), ग्राफिक डिझायनर, वरिष्ठ सामग्री लेखक (हिंदी), कनिष्ठ सामग्री लेखक (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) यांसह अनेक पदासांठी अर्ज मागवले आहेत.

यातील प्रत्येक पदासांठी पात्रता वेगवेगळी आहे. यातील काही पदांसाठी 12 वी पास असणारे व्यक्ती अर्ज करु शकता. तर काही पद ही पदवी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहे. या पात्रतेशी संबंधित माहितीसाठी उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.

रिक्त पद

प्रमुख सल्लागार – 01 पद सोशल मीडिया मार्केटिंग (वरिष्ठ सल्लागार) – 01 पद सोशल मीडिया (कनिष्ठ सल्लागार) – 01 पद ग्राफिक डिझायनर – 01 पद वरिष्ठ सामग्री लेखक (हिंदी) – 01 पद कनिष्ठ सामग्री लेखक (हिंदी) – 01 पद सोशल मीडिया मार्केटिंग (कनिष्ठ सहकारी) – 03

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे 22 वर्षे ते 58 वर्षे इतके असावे. त्याचबरोबर कोट्यासाठी वयाची सवलत दिली आहे. इच्छूक उमेदवारांसाठी जारी केलेले अधिकृत नोटीफिकेशन पाहावे.

अर्ज करण्याची पद्धत 

इच्छूक आणि भरतीसाठी पात्र उमेदवारांना 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर उमेदवाराने संबंधित कागदपत्रांसह consultants2021-1ss@sansad.nic.in मेलवर पाठवावा. या पदांसाठी उमेदवारांची निवड (Walk In Interview) आधारे केली जाईल. (Lok Sabha Secretariat Recruitment 2021)

संंबंधित बातम्या : 

NHRC Recruitment 2021: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात बंपर भरती; ‘असा’ करा अर्ज

Railway Recruitment 2021 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांना करता येईल अर्ज

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें