महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा एक व दोनचे प्रवेश प्रमाणपत्र जारी

| Updated on: Jan 21, 2022 | 11:26 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर 2 पोलीस उपनिरीक्षक परीक्षेकरीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 ही 29 जानेवारी 2022 ला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर 2 ही परीक्षा येत्या 30 जानेवारीला होणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा एक व दोनचे प्रवेश प्रमाणपत्र जारी
एमपीएससीची मोठी भरती
Image Credit source: mpsc website
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (Exam) 2020 संयुक्त पेपर 1 व महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर 2 पोलीस उपनिरीक्षक परीक्षेकरीता उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यातील महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर 1 ही 29 जानेवारी 2022 ला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर 2 ही परीक्षा येत्या 30 जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर संबंधित परीक्षांचे हॉल तिकीट (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन, हे हॉलतिकीट डाऊनलोड करण्याच्या सूचना परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

काय म्हटले आहे प्रसिद्धी पत्रकात

या बाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून, या प्रसिद्ध पत्रकात विद्यार्थ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ”परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिर्वार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्धवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे वाहतूक समस्या अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिर्वाय आहे. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहीत केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. कोव्हिड 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य आहे”.

कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परीक्षेच्या वेळी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांनी मास्क घालून यावे, योग्य त्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा. असे आवाहन आयोगाकडून उमेदवारांना करण्यात आले आहे. तसेच हॉलतिकीट संदर्भात काही अडचन आल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आव्हान देखील करण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या

झारखंडच्या तरुणाची गगनभरारी, अ‍ॅमझॉनकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज; जाणून घ्या शुभम राजचा प्रेरणादायी प्रवास

तुम्हाला सुद्धा IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन!!

लिंक्डइन सर्वे: यंदा नोकरी बदलाची लाट, 82% कर्मचाऱ्यांचा जॉब चेंजचा मूड!