AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला सुद्धा IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन!!

आपल्यापैकी अनेक जण IAS आणि PCS या दोघांना एकच समजत असतात परंतु या दोघांचे कार्य आणि यांचे मानधन या दोघांमध्ये खूपच फरक पाहायला मिळतो परंतु याची अनेकांना कल्पना नसते म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा भविष्यात IAS आणि PCS व्हायचं असेल तर या दोघांमधील फरक आणि मानधन जाणून घ्यायला हवे.

तुम्हाला सुद्धा IAS आणि PCS व्हायचं असेल तर जाणून घ्या यांच्यातील फरक आणि यांचे मानधन!!
IAS PCS
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 5:28 PM
Share

मुंबईः देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून IAS आणि IPS सारख्या अधिकाऱ्यांची निवड होत आली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इंग्रजांच्या (British) काळापासून या अधिकार्‍यांची (Officer) निवड होत असे. तेव्हा या पदाचे नाव वेगळे होते.इंग्रजांना जेव्हा भारतामध्ये (India) शासन चालवण्याची गरज भासू लागली तसेच टॅक्स जमा करण्याची आवश्यकता भासू लागली तेव्हा अशा वेळी उच्च पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची भरती सुरू करण्यात आली त्यासाठी त्यांनी 1893 ICS म्हणजे इम्पीरियल सिविल सर्विसेज नावाची एक प्रशासकीय सेवा सुरू केली. या सेवेमध्ये निवडले गेलेले अधिकारी त्यावेळी ICS म्हणून ओळखले जात असे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही सेवा होती ती सेवा तसेच ठेवण्यात आली परंतु या पदाच्या नावात बदल करण्यात आला. या पदाचे ICS ऐवजी IAS करण्यात आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्य शासनाने सुद्धा आपले कार्य व्यवस्थित चालावे या करिता, शासन व्यवस्था व्यवस्थित राहावी याकरिता योग्य स्वरूपामध्ये आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आणि अशा वेळी या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा होऊ लागली. या अधिकाऱ्यांना PCS म्हंटले जाऊ लागले.आज आम्ही तुम्हाला आयएएस आणि पीसीएस या अधिकारी यांच्या बद्दल अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहोत..

काय आहे IAS ?

एक आयएएस भारताच्या अखिल भारतीय सेवातील एक प्रशासकीय भाग आहे. हे अधिकारी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सार्वजानिक क्षेत्रातील अनेक ठिकाणी पदस्थापित असतात.आणि सरकारच्या विविध कामकाज पार पाडण्यास मदत करत असतात. आयएएस अधिकारी यांची भरती संघ लोक सेवा UPSC आयोगाद्वारे केली जाते.या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारत सरकार द्वारे वेगवेगळ्या राज्यात पोस्टिंग दिली जाते.या परीक्षेत अव्वल येणाऱ्या उमेदवारांची निवड आयएएस या पदासाठी केली जाते.

काय असते PCS ?

यूपीएससी प्रमाणेच प्रत्येक राज्याची स्वतः ची अशी एक पब्लिक सर्विस कमीशन असते. या पब्लिक सर्विस कमिशन द्वारे राज्‍य स्तरीय परीक्षाद्वारा अनेक विभिन्न अधिकारी यांची नियुक्ति केली जाते.या अधिकारी यांना प्रोविंशियल सिविल सर्विसेज म्हणजेच पीसीएस म्हंटले जाते. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना SDM, ARTO, DSP, BDO ituadi उच्च तसेच महत्वपूर्ण पदांवर नियुक्ती केली जाते. पीसीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती ज्या राज्यांमध्ये केले जाते त्या राज्यांमध्ये त्यांची बदली सुद्धा होत असते म्हणूनच कोणत्या अन्य दुसरा ज्यामध्ये त्यांची नियुक्ती केली जात नाही.

आयएएस आणि पीसीएस यांच्यातील फरक (Differences between IAS and PCS)

आयएएस अधिकाऱ्यांची निवड यूपीएससी द्वारा आयोजित करण्यात येणाऱ्या सिविल सर्विसेज परीक्षा द्वारे केली जाते तसेच पीसीएस अधिकाऱ्यांची निवड की परीक्षा सर्व राज्यस्तरीय वर राज्य लोकसेवा आयोग द्वारा आयोजित केलेल्या परीक्षाद्वारे केले जाते.

आयएएसची निवड आणि सेवा संबंधित सर्व गोष्टींचे निर्णय केंद्र द्वारे स्थापित केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण साह्याने केले जाते तसेच पीसीएस अधिकारीची निवड आणि सेवा संबंधित सर्व निर्णय राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण करतो.

आयएएस बनण्यासाठी एक परीक्षा अनिवार्य असते त्या परीक्षेचे नाव सी सेट आहे. तसेच राज्य लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाते त्यामध्ये सी सेट परीक्षा असू शकते किंवा नसू सुद्धा शकते.

यूपीएससी परीक्षामध्ये एक क्वालीफाइंग क्षेत्रीय भाषेचा पेपर असतो तसेच पीसीएस परीक्षा मध्ये अनिवार्य स्वरूपात क्षेत्रीय भाषा किंवा सांख्यिकीय एक पेपर असतो.

अभ्यासाचे स्वरूप

केंद्र द्वारे आयोजित यूपीएससीच्या परीक्षामध्ये प्रश्न हे प्रामुख्याने अध्यात्म तसेच तुलनात्मक दृष्टीकोनातून विचारले जातात त्याचबरोबर जनरल नॉलेज वर आधारित अनेक प्रश्न सुद्धा विचारले जातात त्याचबरोबर जेव्हा आपण पीसीएस परीक्षेबद्दल अभ्यास करतो तेव्हा या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे तथ्यात्मक स्वरूपामध्ये असणारे विचारले जातात.

– यूपीएससी परीक्षामध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती राष्ट्रपती द्वारे केली जाते तसेच पीसीएस अधिकारी यांची नियुक्ती राज्यातील राज्यपाल करत असतात.

सेवा दरम्यान एखाद्या आयएएस अधिकारी कामावरून कमी करण्याचे हक्क तसेच त्याला बरखास्त करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. तसेच पीसीसीएस अधिकार याबद्दल त्याला पदावरून कमी करण्याचे अधिकार राज्य सरकार करू शकते.

राज्यानुसार वेतन

संपूर्ण देशामध्ये एखादा आयएएस अधिकारी कोठेही सर्विसला असुदे त्याचे वेतन व मानधन सर्वांसारखे एक समान असते तसेच पीसीएस अधिकाऱ्यांचे मानधन प्रत्येक राज्य ठरवत असतो.

नियुक्ती ते पदोन्नती

जेव्हा आपण या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबद्दल व तसेच प्रमोशन बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा एक आयएएस अधिकारी एसडीएम पासून आपल्या करिअरची सुरुवात करतो राज्य व केंद्र यांचे सचिव मुख्य सचिवपद पर्यंत जाऊ शकतो तसेच पी सी एस अधिकारी यांची पदोन्नती आयएएस केडर पर्यंत जाते आणि राज्यांमध्ये सचिव पदापर्यंत यांना नियुक्त करता येऊ शकते.

आयएएस अधिकारी यांचे ट्रान्सफर म्हणजेच बदली स्टेट कार्डर शिवाय पूर्ण देशांमध्ये कुठेही करता येते परंतु पीसीएस अधिकाऱ्यांची बदली राज्याच्या बाहेर होत नाही.

एका आयएएस अधिकाऱ्याची सॅलरी म्हणजेच पगार आणि पेन्शन त्याच्या संबंधित कार्ड द्वारे दिले जाते तसेच पीसीएस अधिकाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन ची संपूर्ण व्यवस्था राज्य सरकारच्या खांद्यावर असते.

आयएएस आणि पीसीएस यांचे वेतन

एका IAS अधिकारी यांचे वेतन खूपच चांगला असतो जर सातवे कमिशन नंतर एका आयएएस ऑफिसची पगार 56,100 से 2.5 लाख रुपये दर महिना या दरम्यान असते. तसेच पी सी एस अधिकारी यांचा पगार सुद्धा काही कमी नसतो तसे पाहायला गेले तर प्रत्येक राज्यानुसार या अधिकाऱ्यांचा पगार कमी जास्त स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण यूपी राज्याबद्दल जाणून घेतले तर तेथील एका पी सी एस अधिकारी यांचा पगार 56,000 से 1,32,000 रुपये एवढा आहे तसेच जास्तीत जास्त पे लेव्हल 15 वर पोहोचल्यानंतर त्यांचा पगार 1,82,200 से 2,24,100 रुपये इतका असतो सोबतच या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा सुविधा दिल्या जातात.

संबंधित बातम्या

शाळांपाठोपाठ वसतिगृहेही सुरु होणार, धनंजय मुंडे यांचे प्रशासनाला आदेश

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, पॅरालिम्पिकपटू अवनी लेखराला स्पेशल सीट असलेली कस्टमाइझ XUV700 दिली भेट

‘गांधीजींची हत्या करणाऱ्याला हिरो बनवलं जात असेल तर तीव्र विरोध करु’, अमोल कोल्हेंच्या त्या चित्रपटाविरोधात काँग्रेस आक्रमक

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.