Success Story : झारखंडमधील (Jharkhand) तरुण देखील आता मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये आपली जागा निर्माण करत असल्याचे पहायला मिळत आहे. झारखंडमधील एका तरुणाला अॅमझॉन बर्लिनमध्ये (Amazon Berlin) जॉबची संधी मिळाली आहे. या तरुणाला कंपनीकडून तब्बल 1.15 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शुभम राज (Shubham Raj) असे या तरुणाचे नाव असून, तो रांचीचा रहिवाशी आहे. शुभम राज याची कंपनीमध्ये सॉफ्टवअर डेव्हलपर इंजिनिअर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुभम राज याचा कोडिंगमध्ये हातखंडा आहे. या तरुणावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांनी पेढे वाटून हा आनंद साजरा केलाय. शुभम बद्दल अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. यापूर्वी देखील शुभम राज याला अनेक कंपन्यांकडून जॉबची ऑफर आली असल्याची माहिती त्याने दिली.