नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात जॉब मार्केटमध्ये (JOB MARKET) मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. आघाडीचे जॉब सर्च इंजिन ‘लिंक्डइन’ने नुकताच सर्वेक्षणाचा अहवाल जारी केला आहे. त्यानुसार 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या फ्रेशर्सची आहे. 92 टक्के फ्रेशर्सनी वर्ष 2022 मध्ये नोकरी बदलणार असल्याचे म्हटले आहे. लिंक्डनचा (LINKEDIN) अहवाल 1111 कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर आधारित आहे. नोकरी बदलण्याचे कारणे विविध आहेत. काम-वैयक्तिक (LIFE-WORK AMBULANCE) आयुष्याचे संतुलन न राखल्यामुळे 30 टक्के कर्मचारी नोकरी बदलण्याच्या तयारीत आहेत. काम आणि कुटूंबाला योग्य वेळ मिळेल अशारितीने हे सर्व जण नवीन जागेच्या शोधात आहेत. दुसरीकडे पर्याप्त वेतन नसल्यामुळे 28 टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी बदलण्याचा कल व्यक्त केला आहे. तर 23 टक्के कर्मचाऱ्यांनी करिअरच्या प्रगतीसाठी नोकरी बदलण्याचा इरादा सर्वेक्षणात व्यक्त केला आहे.