नवी दिल्ली : शासकीय सेवांच्या शोधात असलेल्या दहावी, बारावी आणि पदवीधर उमेदवारांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) तर्फे मोठ्या संख्येने रिक्त जागांसाठी पदभरती करण्यात आली आहे. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC), स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांचा यात समावेश आहे. एकूण 3847 पदांवर ही भरती होणार आहे. ‘इएसआयसी’ हे भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येते. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जाची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू होईल. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.