कामाची बातमी! मार्कशीट, डिग्रीचा कागद जपून ठेवायची चिंता कायमची संपली? होय, खरंच!

विद्यापीठ अनुदान आयोगाने  ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’ योजना हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहेत आणि एका क्लिकवर विद्यार्थ्यांना कागदपत्रे उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी किंवा एका शैक्षणिक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेताना विविध स्वरुपाची शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागतात.

कामाची बातमी! मार्कशीट, डिग्रीचा कागद जपून ठेवायची चिंता कायमची संपली? होय, खरंच!
DigiLocker
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 9:31 PM

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील विद्यापीठे (University) आणि महाविद्यालयांना डिजिलॉकर (Digi Locker) अकाउंटमध्ये उपलब्ध पदवी, गुणपत्रक आणि अन्य कागदपत्रांना वैध प्रमाणपत्राचा दर्जा बहाल करण्याचे निर्देश जारी केले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांना याविषयीचे अधिकृत पत्रक जारी केले आहे.  ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’वर (एनएडी) शैक्षणिक संस्थांच्याद्वारे डिजिटल स्वरुपात गुणपत्र व पदवी प्रमाणपत्र आॕनलाईन स्वरुपात जतन केले जाते. शैक्षणिक संस्था डिजिलॉकर एनएडी पोर्टलच्या माध्यमातून आपली नोंदणी करू शकतात आणि आपल्या संस्थांची शैक्षणिक कागदपत्रे एनएडी वर अपलोड करू शकतात.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) सहित अनेक राज्य आणि केंद्रीय शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आणि उच्चतम शैक्षणिक संस्था डिजिलॉकर प्लॕटफॉर्म वर परीक्षेच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्र, ट्रान्सफर सर्टिफिकेट उपलब्ध करतात. विद्यार्थी आपली कागदपत्राच्या डिजिटल प्रती प्राप्त करण्यासाठी डिजिलॉकर अॕप डाउनलोड करुन नोंदणीकरण करू शकतात. अकाउंट बनविल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण शैक्षणिक कागदपत्रे संग्रहित करू शकतात आणि तुम्ही आवश्यकतेवेळी केव्हाही वापर करू शकतात.

नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’ म्हणजे काय?

विद्यापीठ अनुदान आयोगाने  ‘नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी’ योजना हाती घेतली आहे. विद्यार्थ्यांची कागदपत्रे सुरक्षित ठेवली जाणार आहेत आणि एका क्लिकवर विद्यार्थ्यांना कागदपत्रे उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी किंवा एका शैक्षणिक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत प्रवेश घेताना विविध स्वरुपाची शैक्षणिक कागदपत्रे सादर करावी लागतात. विद्यार्थ्यांना सातत्याने कागदपत्रे सादर करावे लागू नये म्हणून एनएसडी योजना आखली. विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी केवळ एनएसडी क्रमांक संबंधित संस्थेला सादर करावा लागतो. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानंतरही अनेक विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांनी ‘एनएसडी’ अंमलबजावणी केली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच, दिवसभरात 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण, ओमिक्रॉन रुग्णांचा आकडाही दोनशे पार

‘होय! अंगावरचं दूध पाजताना त्रास झाला’, करीनापासून लारा दत्तापर्यंत, कोणती अभिनेत्री काय म्हणाली?

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.