Mahsul Vibhag Bharti 2025 : राज्य महसूल विभागात नोकरीची संधी, असा करा अर्ज
Mahsul Vibhag Bharti Jobs 2025 : महाराष्ट्र राज्य महसूल विभागात नोकरीची संधी आहे. भरती प्रक्रियेचा बिगुल वाजला आहे. या पदांसाठी 7 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यासाठी आता अवघे नऊ दिवस उरले आहेत.

सध्या सरकारी नोकरी मिळवणे अवघड झाले आहे. सरकारी भरती प्रक्रियेत स्पर्धा वाढली आहे. पण सरकारी नोकरी असल्याने अनेकांचा ओढा अजूनही या नोकरीकडे आहे. महिला आणि बाल कल्याण विभागात भरती प्रक्रियेला हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यापूर्वी गृहविभागात मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. आता राज्य महसूल विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदांसाठी 7 मार्च 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यासाठी आता अवघे नऊ दिवस उरले आहेत. तेव्हा त्वरा करा. लगेचच अर्ज भरा.
महसूल न्यायाधिकरणात संधी
राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे मुख्य पीठ बृहन्मुंबई आणि पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील खंडपीठासाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, न्यायायिक आणि प्रशासकीय सदस्य या पदांवरील नियुक्त्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आता जास्त कालावधी हाती उरलेला नाही. या नऊ दिवसात तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.
या पदांसाठी 5 फेब्रुवारी 2025 रोजीपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी 7 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येईल. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. jla.revenue@maharashatra.gov.in या ईमेल आयडीवर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. अथवा जाहिरातीत नमूद अर्ज नमुन्यात संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवता येऊ शकतो.
महसूल व वन विभाग भरती 2025
महाराष्ट्र महसूल व वन विभागा अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी ही पीडीएफ MRT_Advertisement_2025 तुम्हाला उपयोगी पडेल. यामध्ये रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर विहित नमु्न्यात अर्ज करा. हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने करता येईल. या पदासाठी चांगला पगार आहे. त्यामुळे तरुणांनी ही संधी सोडू नये. तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर लागलीच अर्ज करा. या पदासाठी आवश्यक ती पुस्तकं, प्रश्नपत्रिका यांची जमवाजमव करा आणि तयारी लागा. या पदासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही. 7 मार्च 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
