Career Option : पर्यावरण क्षेत्रात करा करिअर; हे कोर्स करा आणि लाखो रुपये कमवा

पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत, अर्थात या क्षेत्रामध्ये नोकरीच्या विविध सुवर्णसंधी आहेत. (Make a career in the field of environment; Do this course and earn millions of rupees)

Career Option : पर्यावरण क्षेत्रात करा करिअर; हे कोर्स करा आणि लाखो रुपये कमवा
पर्यावरण क्षेत्रात करा करिअर
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 10:13 AM

नवी दिल्ली : पर्यावरणात फार मोठे बदल घडून येत आहेत. या बदलाच्या विविध परिणामांना केवळ देश नव्हे तर संपूर्ण जगालाच सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत पर्यावरण संरक्षणाबाबत मोठ्या प्रमाणावर जागरुकता केली जात आहे. अशा परिस्थितीत जलवायू परिवर्तन रोखण्यासाठी तरुणांचा कल वाढला आहे. अनेक ठिकाणी तरुण मंडळी पर्यावरण संरक्षणाबाबत रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसत आहेत. याचवेळी दुसरीकडे पर्यावरणाच्या क्षेत्रात करिअर करण्याकडेही तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. होय, पर्यावरण आणि जलवायू संरक्षणाच्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. यात तुम्हाला चांगल्या सॅलरी पॅकेजबरोबर सन्मानाचा हुद्दा मिळू शकतो. पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत, अर्थात या क्षेत्रामध्ये नोकरीच्या विविध सुवर्णसंधी आहेत. (Make a career in the field of environment; Do this course and earn millions of rupees)

एन्व्हायरमेंट लॉयर

पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचतात. अशा परिस्थितीत तरुणांना एन्व्हायरमेंट लॉयर बनूनही पर्यावरण संरक्षणाचे मौलिक काम करता येईल. एन्व्हॉयरमेंट लॉयर हे पर्यावरणासंबंधी कायद्याचे उत्तम जाणकार असतात. भारतात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांसारखी विशेष न्यायालये असून त्यांच्यापुढे पर्यावरणाशी संबंधित खटल्यांची सुनावणी चालते. यासाठी बारावी इयत्तेनंतर 5 वर्षांचा इंटीग्रेटेड लॉ कोर्स किंवा पदवीनंतर एलएलबीपर्यंतचे शिक्षण केले जाऊ शकते. हा कोर्स अथवा शिक्षण घेऊन तुम्ही एक ते तीन वर्षांच्या अनुभवानंतर जवळपास 50 हजार रुपये सॅलरी मिळवू शकता.

वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट

ज्या तरुणांना वन्यजीवाची आवड आहे, ते तरुण वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणून आपले करिअर करू शकतात. यासाठी तुम्हाला सर्वात आधी विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण व्हावे लागेल किंवा बायोलॉजिस्ट सायन्समध्ये बीएससी म्हणजेच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागेल. या क्षेत्रात अ‍ॅण्टी बीएससी अ‍ॅग्रीकल्चर करून नोकरी मिळवू शकता. याशिवाय एन्व्हायरमेंटल सायन्समध्येह बीएससी करू शकात. एक वाईल्ड लाईफ सायंटिस्ट सुरुवातीला 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत सॅलरी मिळवू शकतो.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस

यूपीएससीमार्फत दरवर्षाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची परिक्षा घेतली जाते. आयएएस आणि आयपीएस पातळीवरची ही परिक्षा सहाय्यक वन संरक्षक, जिल्हा वन संरक्षक आणि वन संरक्षक यांसारख्या प्रमुख पदांच्या भरतीसाठी आयोजित केली जाते. एक आयपीएस अधिकार्याची महिन्याची सॅलरी 80 हजार रुपयांच्या आसपास असते. याशिवाय अन्य विविध प्रकारच्या सुविधाही मिळतात.

एन्व्हायरमेंट इंजिनिअर

एन्व्हायरमेंट इंजिनिअरच्या क्षेत्रात करिअर बनवण्याचा उत्तम पर्याय तरुणांपुढे आहे. या माध्यमातून प्रोग्राम किंवा प्रोडक्ट्स बनवून पर्यावरणाचा विकास करण्याचे काम केले जाऊ शकते. यासाठी एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंगमध्ये बीटेक आणि एमटेक करावे लागेल. यानंतर विविध सरकारी आणि गैरसरकारी संस्थांमध्ये काम मिळू शकते. एन्व्हायरमेंट इंजिनिअरला दर महिन्याला साधारण एक ते तीन लाख रुपयांपर्यंत सॅलरी मिळू शकते. (Make a career in the field of environment; Do this course and earn millions of rupees)

इतर बातम्या

मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?

महिन्याला फक्त 1500 रुपये जमा करून 53 लाख मिळवा, गुंतवणुकीची जबरदस्त प्रक्रिया

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.