AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada Answer Key : म्हाडाकडून सरळसेवा परीक्षेची उत्तरतालिका जाहीर,15 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी

म्हाडा सरळसेवा भरतीची परीक्षा दिलेल्या उमदेवारांना उत्तरतालिका (Mhada Recruitment exam Answer Key) आजपासून पाहायला मिळतील.

Mhada Answer Key : म्हाडाकडून सरळसेवा परीक्षेची उत्तरतालिका जाहीर,15 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी
MHADA EXAM
| Edited By: | Updated on: Feb 10, 2022 | 1:59 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून (Mhada) आयोजित करण्यात आलेली विविध पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा पार पडलीय. म्हाडाकडील पदभरती (Mhada Recruitment 2021) ही सरळसेवा पद्धतीनं राबवली जात आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. आफलाईन परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यानं म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेत परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हाडाकडून आता उत्तरतालिकेविषयी महत्त्वाची माहिती कळवली आहे. म्हाडा सरळसेवा भरतीची परीक्षा दिलेल्या उमदेवारांना उत्तरतालिका (Mhada Recruitment exam Answer Key) आजपासून पाहायला मिळतील. म्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील.

विद्यार्थ्यांना त्यांच्या खात्यात लिंक उपलब्ध होणार

म्हाडा सरळसेवा भरती 2021 अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर आज लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका देखील पाहता येईल, असं महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे सचिव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

उत्तर तालिकेवर आक्षेप नोंदवण्याची संधी

म्हाडाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत काही आक्षेप असतील 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान नोंदवता येतील. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे निश्चित केलेले शुल्क भरून आक्षेप (Objection) नोंदविता येतील. एका प्रश्नपत्रिके संबंधी आक्षेपाकरीता उमेदवारांना पाचशे रुपये एवढे शुल्क भरावे लागेल.

कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ लवकरच मिटणार ; राज्य सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

OnePlus Nord CE 2 5G हा मोबाईल 17 फेब्रुवारीला होणार लाँच, जाणून घ्या महत्त्वाचे फीचर्स

Mhada Recruitment 2021 released answer key link candidates can check their login and submit objection if needed

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.