MP NHM CHO 2021 : कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या 3570 पदांवर भरती

| Updated on: Feb 01, 2021 | 8:40 PM

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सच्या (CHO) पदांवरील भरती जाहीर करण्यात आली आहे. (NHM CHO vacancy)

MP NHM CHO 2021 : कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या 3570 पदांवर भरती
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (नॅशनल हेल्थ मिशन – एनएचएम) मध्य प्रदेशकडून कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सच्या (CHO) पदांवरील व्हॅकेन्सी (भरती) जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत 3 हजार 570 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या रिक्त पदांव्यतिरिक्त कम्युनिटी हेल्थ विभागातील 6 महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्सबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. (MP NHM CHO vacancy for Community Health Officers)

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या या रिक्त पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावरुन (sams.co.in) ऑनलाईन अर्ज करू शकतील. या रिक्त पदांबाबत संपूर्ण माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) nhmmp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर 17 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

अर्ज कसा कराल?

अर्ज करण्यासाठी सर्वात आधी संबंधित विभागाची अधिकृत वेबसाईट sams.co.in वर जावं लागेल. त्यानंतर वेबसाईटच्या होम पेजवर Requirements of 3570 Community Health Officers (CHOs) ही लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर ADVERTISEMENT & ONLINE APPLICATION FORM वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला अर्ज भरण्याचा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करुन तुम्ही अर्ज भरू शकता.

निवड कशी होणार?

कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सच्या (Community Health Officers) 3570 पदांवर भरती होणार आहे. यासाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 6 महिने कम्युनिटी हेल्थ ट्रेनिंग (आरोग्य प्रशिक्षण) दिले जाईल. या रिक्त पदांबाबत संपूर्ण माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) चे अधिकृत संकेतस्थळ nhmmp.gov.in ला भेट द्या.

वेतन किती असेल?

कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये वेतन मिळेल. त्याचबरोबर प्रशिक्षण व इंटर्नशिप कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर दरमहा 15,000 रुपये स्टायफंड दिला जाईल, परंतु त्यासाठी तुमच्या कामगिरीचा विचार केला जाईल. या रिक्त पदांव्यतिरिक्त कम्युनिटी हेल्थ विभागातील 6 महिन्यांच्या सर्टिफिकेट कोर्सबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे

पात्रता आणि वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम किंवा बीएएमएस पदवी मिळवणे आवश्यक आहे. याशिवाय थेट भरतीसाठी उमेदवारांनी बीएससी नर्सिंगसह कम्युनिटी हेल्थमध्ये एकात्मिक अभ्यासक्रमाची पदवी घेतली पाहिजे. तसेच उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी उमेदवारांच्या वयाची गणना 1 फेब्रुवारी 2020 नुसार केली जाईल (म्हणजेज 1 फेब्रुवारी 2020 रोजी तुमचं वय किती होतं? त्यानुसार तुमची पात्रता ठरवली जाईल). आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वय मर्यादेमध्ये सवलत दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या

Sarkari Naukri 2021: 10 वी आणि 12 वी पासही अर्ज करू शकतात; ‘या’ विभागांत नोकरीची सुवर्णसंधी

Job Alert: 10 वी पाससाठी बंपर भरती, SSC MTS Exam 2020ची अधिसूचना ‘या’ तारखेला होणार जारी

 रिलायन्स जिओ, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे?, कसा?, करावा

(MP NHM CHO vacancy for Community Health Officers)