Special story | रिलायन्स जिओ, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे?, कसा?, करावा

Special story | रिलायन्स जिओ, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे?, कसा?, करावा
jobs

भारतात सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायंस जिओने (Reliance JIO Recruitment)चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. (recruitment Reliance jio Indian Oil)

prajwal dhage

|

Jan 30, 2021 | 11:36 AM

मुंबई : भारतात सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी रिलायंस जिओने (Reliance JIO Recruitment)चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. जिओ आपल्या भरती प्रक्रियेत फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना संधी देणार आहे. जिओ या कंपनीने https://careers.jio.com वर याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या वेबसीईटवर जिओ कंपनीने पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया पाहता येईल. खासगी क्षेत्रात काम करण्याची  आवड असणाऱ्या तरुण, तरुणींना ही चांगली संधी आहे. (recruitment in Reliance jio and Indian Oil Corporation limited)

या पदांसाठी करु शकता अर्ज

रिलायन्स जिओने 200 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, इंटरप्राइज सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिसेस, इंजीनिअरिंग अ‌ॅण्ड टेक्नॉलॉजी, एचआर अ‌ॅण्ड ट्रेनिंग ऑपरेशन्स अशा क्षेत्रात वेगवेगळ्या पदांसाठी रिलायन्स जिओने अर्ज मागवले आहेत. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर रिलायन्स जिओकडून उमेदवारांची यादी https://careers.jio.com या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. त्यामुळे अर्ज केलेल्या उमेदवारांनी वरील वेबसाईटवर वेळोवेळी भेट द्यावी.

 इंडियन ऑईलमध्ये  ज्युनियर इंजीनिअर असिस्टंट पदासाठी भरती

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ज्युनियर इंजीनिअर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. याविषयी IOCLने परिपत्रक काढले असून आपल्या iocrefrecruit.in या वेबसाईवर भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

IOCL एकूण 16 ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) पदासाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. इच्छुक उमेदवार 19 फेब्रवारी 2021 पर्यंत त्यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज प्रक्रिया पार पाडल्यानंतर ज्युनियर इंजीनियर असिस्टंट -IV (प्रोडक्शन) या पदासाठी फेब्रुवारी महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. एकूण 16 जागांपैकी 9 जागा खुला प्रवर्ग, 4 जागा ओबीसी प्रवर्ग, 2 जागा एसी प्रवर्ग आणि एक जागा आर्थिकदृष्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आरक्षित आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

ज्युनियर इंजीनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्यासाठी केमिकल/रिफाईनरी अ‌ॅण्ड पेट्रोकेमिकल या क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. तसेच, बीएससी (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) केलेल्या उमेदवारांनासुद्धा या पदासाठी अर्ज करता येतील. खुला प्रवर्घ तसेच EWS च्या उमेदवारांसाठी कमीत कमी 50 टक्क्यांच्या गुणांची अट आहे. एससी/एसटी साठी ही मर्यादा 45 टक्के आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची हार्ड कॉपी डेप्यूटी जनरल मॅनेजर (एचआर), बरूनी रिफाइनरी, पीओ- बरूनी ऑयल रिफाइनरी, बेगुसराय बिहार – 851114 या पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज पाठवण्याची अंतिम तारिख 27-02-2021 आहे.

याविषयी अधिक माहिती हवी असेल तर येथे क्लिक करा

संबंधित बातम्या :

Special Story | Government Job 2021: ITI पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘या’ विभागांत बंपर भरती

Special Story| Government Job 2021 : आठवी पासना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ विभागांत मिळतोय 90 हजारांपर्यंत पगार

(recruitment in Reliance jio and Indian Oil Corporation limited)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें