शाहरुख, सलमान राहतात त्याच मुंबईत राहायचे असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी… पगार लाखापर्यंत, फक्त या अटी पूर्ण करा; जाणून घ्या कुठे आहे भरती

Job Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी असून लगेचच अर्ज करा. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही भरतीसाठी अर्ज करू शकता.

शाहरुख, सलमान राहतात त्याच मुंबईत राहायचे असेल तर ही नोकरी तुमच्यासाठी... पगार लाखापर्यंत, फक्त या अटी पूर्ण करा; जाणून घ्या कुठे आहे भरती
| Updated on: Jul 26, 2025 | 10:55 AM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही कुठेही बसून आरामात या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. 23 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत, इच्छुकांनी फटाफट अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया टाटा मूलभूत संशोधन संस्थाकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 9 ऑगस्ट 2025 असून त्यापुर्वीच इच्छुकांना अर्ज ही करावी लागणार आहेत. प्रशासकीय सहाय्यक, वैज्ञानिक अधिकारी, लिपिक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी ,कार्य सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. 

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने पदानुसार शिक्षणाची अट लागू करण्यात आली. अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी लेखी परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर मुलाखत किंवा थेट मुलाखतीमधूनच निवड केली जाईल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना तो अगोदर काळजीपूर्वक वाचावा. पगार/ मानधन हे दरमहा रु. 35,393/  ते रु. 1,00,600/ पर्यंत असेल.

जर तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर प्रशासकीय अधिकारी (डी), भरती कक्ष,नोकरी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई येथे आपला अर्ज पाठवावा. ऑनलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला याबद्दलची माहिती टाटा संशोधन संस्थाच्या बेवसाईटवर मिळेल. मग विचार कशाला करत आहात, लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा किंवा फक्त मुलाखतीतूनच निवड ही होऊ शकते. परत एकदा लक्षात ठेवा भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 9 ऑगस्ट आहे.