AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महापालिकेत 52 जागांसाठी भरती, 17 ते 75 हजारांपर्यंत मानधन

स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महापालिकेत 52 जागांसाठी भरती, 17 ते 75 हजारांपर्यंत मानधन
सैन्य दलांमध्ये 400 पदांची भरती, एनडीए परीक्षेची तारीख जाहीर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Nov 19, 2021 | 7:30 AM
Share

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 52 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात.ही पदं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असल्यानं त्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंध असणार नाही, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

26 नोव्हेंबरला मुलाखतीचं आयोजन

पिंपरी चिंचवड महापालिकेत आरोग्य विभागात 52 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, गुणवत्ता अन्वेषक सहायक या पदांसाठी 26 नोव्हेंबरला पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं आहे.

थेट मुलाखतीद्वारे निवड

मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 17 हजारांपासून 75 हजारांपर्यंत मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

कंत्राटी तत्त्वावर निवड:

पिंपरी चिचंवड महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत 52 पदांची भरती करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांची सेवा ही 31 मार्च 2022 पर्यंत वैध असेल. तर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन पदासाठी कौशल्य चाचणी घेण्यात येईल. ही पदं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असल्यानं त्याचा पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंध असणार नाही, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

इतर बातम्या

VIDEO : Nawab Malik | भांडाफोड होईल म्हणून पहिल्या पत्नीच्या भावाकडे समीर वानखेडेने ड्रग्ज ठेवले : नवाब मलिक

कोकणात धुमशान! भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल

नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

PCMC Recruitment 2021 Vacancy for 52 Post in NHUM

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?