कोरोनानं परीक्षा लांबल्या, जाहिरात नाही, MPSC परीक्षांची वयोमर्यादा कधी वाढवणार? मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं पत्र

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह विविध शहरात आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधत परीक्षा आणि इतर प्रश्नांवर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं.

कोरोनानं परीक्षा लांबल्या, जाहिरात नाही, MPSC परीक्षांची वयोमर्यादा कधी वाढवणार?  मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांचं पत्र
एमपीएसी
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 12:27 PM

पुणे: कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा (MPSC) लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एप्रिल महिन्यात कोरोनाचं कारणं देत राज्य सेवा पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यासह विविध शहरात आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद साधत परीक्षा आणि इतर प्रश्नांवर मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे वयोमर्यादा (Age Limit) देखील वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा झाली त्याला बराच वेळ उलटला तरी आदेश निघाला नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. (Pune MPSC Aspirants wrote letter to Uddhav Thackeray regarding extension for age limit in MPSC Exams)

विद्यार्थ्यांना एक वर्ष कधी वाढवून मिळणार

मुख्यमंत्री उद्धव टाकरे यांनी विद्यार्थ्याना वयोमर्यादा वाढवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. गेल्या दीड वर्षाच्या काळात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वय वाढवून कधी मिळणार ?, असा सवाल विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मुख्यममंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली मात्र अजूनही आदेश निघाला नाही.

एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून द्या

कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर अडचणींमुळे एकही जाहिरात निघालेली नाही. याकाळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपली आहे. परिणामी पुण्यातील एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

घोषणा केली आदेश कधी निघणार

गेल्या दीड वर्षापासून एमपीएससीची एकही जाहिरात नाही, अनेक विद्यार्थ्यांच वय संपुष्टात आलंय. विद्यार्थी आंदोलनावेळी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणताही आदेश न निघाल्यानं वय वाढवून कधी मिळणार ?, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

गेल्या दीड वर्षांपासून नवीन जाहिरात आलेली नाही. राज्य सेवा पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी वयोमर्यादा वाढवण्याबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं होतं. वयोमर्यादा कधी वाढवून मिळणार, आयोग काय भूमिका घेतं पाहण महत्वाचं ठरणार आहे. सप्टेंबर 2021 मध्ये पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पत्र लिहिलं आहे. महाविकासआघाडी सरकार आणि लोकसेवा आयोग काय निर्णय घेतोय, याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या:

Indian navy recruitment 2021 : परीक्षेविना ऑफिसर बनण्याची संधी, 2 जुलैपासून अर्ज करता येणार, शैक्षणिक पात्रता काय, पाहा…

Police Recruitment 2021: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती, शेकडो जागा, वाचा अर्ज कसा करायचा?

(Pune MPSC Aspirants wrote letter to Uddhav Thackeray regarding extension for age limit in MPSC Exams)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.