Police Recruitment 2021: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती, शेकडो जागा, वाचा अर्ज कसा करायचा?

पोलीस भरती करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना ओडिशा पोलीस विभागात चांगली संधी आहे. ओडिशा पोलीस रिक्रुटमेंट बोर्डाने (OPRB) पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदांसाठी भरती काढली आहे.

Police Recruitment 2021: पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती, शेकडो जागा, वाचा अर्ज कसा करायचा?
Job


Police Recruitment 2021 नवी दिल्ली : पोलीस भरती करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना ओडिशा पोलीस विभागात चांगली संधी आहे. ओडिशा पोलीस रिक्रुटमेंट बोर्डाने (OPRB) पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) पदांसाठी भरती काढली आहे. ही भरती एकूण 477 जागांसाठी होणार आहे. या पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी सर्वात आधी या भरतीचं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर www.odishapolice.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. या पोलीस भरतीसाठी 22 जून 2021 पासून अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2021 पर्यंत आहे. अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्टही केला जाऊ शकतो (Know new police recruitment 2021 important tips for application).

योग्यता

ओडिशा पोलीस रिक्रुटमेंट बोर्डाने (Odisha Police Recruitment Board) जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार सब-इंस्पेक्टर पदासाठीच्या या भरतीसाठी उमेदवाराचं कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीचं शिक्षण झालेलं असावं. याशिवाय अर्जदाराला उडिया भाषा येत असावी.

वयाची अट

या पदासाठी अर्ज करण्याऱ्याला वयाचीही अट आहे. उमेदवाराचं वय 21 वर्षांपेक्षा अधिक आणि 25 वर्षांपेक्षा कमी असायला हवं. उमेदवाराचं वय 1 जानेवारी 2021 च्या आधारावर मोजलं जाईल. आरक्षणात बसणाऱ्या समुहांसाठी वयाच्या अटेत सूट देण्यात आलीय. याविषयीच्या अधिक माहितीसाठी www.odishapolice.gov.in वरील नोटिफिकेशन वाचावं.

निवड प्रक्रिया

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना कम्प्युटरवर परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होतील. तसेच सायकोलॉजिकल टेस्टही करण्यात येतील. निवड प्रक्रियेविषयीच्या अधिक माहितीसाठी ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या.

हेही वाचा :

IBPS RRB Recruitment 2021 : बँकेतील नोकरी, तगडा पगार, अर्ज करण्यासाठी उरले काही तास!

7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 जुलैपासून वाढणार?

job notification 2021 : बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी बंपर भरती, 15 हजारांपर्यंत पगार!

व्हिडीओ पाहा :

Know new police recruitment 2021 important tips for application

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI