Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्हमध्ये अप्रेंटिसची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये विविध पदांसाठी अप्रेंटिसची संधी निर्माण झाली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये एकूण 492 पदांवर अप्रेंटिससाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.

Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्हमध्ये अप्रेंटिसची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
रेल्वेत नोकरीची संधी


Railway Recruitment 2021 नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये विविध पदांसाठी अप्रेंटिसची संधी निर्माण झाली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये एकूण 492 पदांवर अप्रेंटिससाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. तर, पात्र उमेदवार 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. फिटर ,वेल्डर, वाईंडर, मशिनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक आणि वायरमन या पदांसाठी अप्रेंटिस करण्याची संधी आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी ?

जे उमेदवार चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्कमध्येअप्रेटिंस करु इच्छितात ते सविस्तर नोटिफिकेशन वाचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

अर्ज कुठे करायचा?

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्कमध्ये अप्रेंटिस करणाऱ्या उमेदवारांसाठी दहावी उत्तीर्ण ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. दहावी किंवा समकक्ष मान्यताप्राप्त बोर्डातून परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज करु शकतात. उच्च शिक्षित विद्यार्थी देखील अर्ज करु शकतील, अशी माहिती आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जात वैयक्तिक माहिती, नाव, वडिलांचं नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती भरावी लागेल. apprenticeshipinida.org या वेबसाईटवर उमेदवारांना त्यांचं लॉगीन तयार करावं लागेल.

अर्ज दाखल करण्याची मुदत?

पात्र उमेदवार 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना चित्तरंजन लोकोमोटिव वर्कशॉपमध्ये अप्रेंटिस करण्याची संधी दिली जाईल. अप्रेंटिस भरती प्रक्रिया आणि इतर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार apprenticeshipindia.org या वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

रेल्वेतील अप्रेंटिस साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शाळेतून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे. तर, वेल्डर, वायरमन आणि कार्पेंटर या पदासाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारलं जाणार नाही. गुणवत्ता यादी च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल, असं कळवण्यात आलंय.

आयआरसीटीसीमध्ये अप्रेंटिसची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना भारतीय रेल्वेच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोर्शेन म्हणजेच आयआरसीटीसीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आयआरसीटीसीनं कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांच्या 100 जागांवर अर्ज मागवले आहेत. दहावी पास उत्तीर्ण विद्यार्थी देखील या अप्रेंटिससाठी अर्ज करु शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया कशी ?

जे उमेदवार आयरआसीटीसीमध्ये अप्रेटिंस करु इच्छितात ते सविस्तर नोटिफिकेशन वाचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकतात. apprenticeshipindia.org या वेबसाईटवर पात्र उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.

इतर बातम्या:

IAF AFCAT 2 2021 Result : एफकॅटच्या दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर, अधिकृत वेबसाईटवर तपासा

JEE Main 2021 Result : BArch आणि B Planning साठी निकाल लवकरच जाहीर होणार; अशा प्रकारे तपासा

 

Railway Recruitment for Apprentice in Chittaranjan Locomotive Works for 492 post check details here

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI