भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2,357 पदांसाठी भरती, उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

GDS च्या एकूण 2357 पदांवर भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये 2,357 पदांसाठी भरती, उद्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
postal department

नवी दिल्लीः India Post Recruitment 2021 : पश्चिम डाक बंगाल सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. 10 वी उत्तीर्ण लोकांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. GDS च्या एकूण 2357 पदांवर भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आली

ग्रामीण डाक सेवक पदासाठी या रिक्त पदासाठी (India Post Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आली. या रिक्त पदासाठी अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट 2021 पर्यंत चालणार आहे. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना संकेतस्थळाला भेट देण्याचा आणि अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अर्जात कोणतीही चूक करू नका, चूक आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

पात्रता नेमकी काय?

पश्चिम बंगाल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकपदासाठी भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या या रिक्त जागेत फक्त 10 वी पास उमेदवारच अर्ज करू शकतात. उच्च पात्रता असणारेही या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी दहावीमध्ये गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषय असणे अनिवार्य आहे. यासह किमान 60 दिवसांच्या मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असावे.

वयोमर्यादा किती असावी?

यामध्ये (India Post Recruitment 202) अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावे. 20 जुलै 2021 च्या आधारावर वयाची गणना केली जाईल. तर SC / ST, OBC, PWD, PWD OBC आणि PWD SC / ST प्रवर्गातील उमेदवारांना अनुक्रमे 5, 3, 10, 13 आणि 15 वर्षे सूट देण्यात आलीय.

निवड प्रक्रिया कशी?

पश्चिम बंगाल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकपदांसाठी 10 व्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. वर्ग 10 च्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या श्रेणीनिहाय गुणवत्ता यादीनुसार शेवटी निवडले जाईल.

याप्रमाणे अर्ज करा

पश्चिम बंगालमधील GDS पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट appost.in ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानं मुली NDA ची परीक्षा देणार, प्रवेशासंदर्भात पेच कायम

NDA परीक्षेत महिलांना संधी द्या, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Recruitment for 2,357 posts in Indian Post Office, last date for application tomorrow

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI