AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICG Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

डिवीजन क्लर्क व नागरी कर्मचारी अधिकारी या पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी (ICG Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत, अर्ज प्रक्रिया 60 दिवस सुरू राहील. (Recruitment for various posts in Indian Coast Guard, know how to apply)

ICG Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दलात अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?
भारतीय तटरक्षक दलात अनेक पदांसाठी भरती
| Updated on: May 16, 2021 | 12:33 AM
Share

ICG Recruitment 2021 नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने अप्पर डिव्हिजन लिपिकसह अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरूणांना या भरतीमुळे (ICG Recruitment 2021) दिलासा मिळणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार भारतीय तटरक्षक दलात एकूण 75 पदांसाठी भरती केली जाईल. डिवीजन क्लर्क व नागरी कर्मचारी अधिकारी या पदावर जाहीर झालेल्या या रिक्त पदांसाठी (ICG Recruitment 2021) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत, अर्ज प्रक्रिया 60 दिवस सुरू राहील. या (ICG Recruitment 2021) पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 28 जून 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत संकेतस्थळवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनांचे संपूर्णपणे वाचन केल्यानंतरच या रिक्त पदासाठी अर्ज करा. अर्जाची तारीख संपल्यानंतर, अधिकृत संकेतस्थळावरून अॅप्लिकेशनची लिंक काढून टाकण्यात येईल. (Recruitment for various posts in Indian Coast Guard, know how to apply)

या पदांवर होणार भरती

वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी – 02 नागरी कर्मचारी अधिकारी – 12 नागरी राजपत्रित अधिकारी – 08 विभाग अधिकारी – 07 अप्पर डिव्हिजन लिपीक – 46

पात्रता

भारतीय तटरक्षक दलाने जारी केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही सरकारी विभागात उमेदवार पदस्थ असणे बंधनकारक आहे. पदांनुसार, पात्रतेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत सूचना तपासा.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या वयोमर्यादेविषयी पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण अधिकृत सूचना पाहू शकता. बर्‍याच पदांसाठी वयाची कमाल मर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी. या भरतीबाबत खास बाब म्हणजे त्यात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतीही फी भरण्याची गरज नाही.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीतील प्रेझेंटेशनच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (Recruitment for various posts in Indian Coast Guard, know how to apply)

इतर बातम्या

Video | एवढ्या ‘एका कारणामुळे’ इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेपासून Battlegrounds Mobile India साठी प्री-रजिस्ट्रेशन सुरु होणार, जाणून घ्या सर्वकाही

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.