Infinix चा ट्रिपल धमाका, मोठ्या डिस्प्लेसह तीन दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

इन्फिनिक्सने (Infinix) एकाच वेळी ट्रिपल धमाका केला आहे. कंपनीने जबरदस्त फीचर्स असलेले तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Infinix चा ट्रिपल धमाका, मोठ्या डिस्प्लेसह तीन दमदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Infinix Note Series

मुंबई : इन्फिनिक्सने (Infinix) एकाच वेळी ट्रिपल धमाका केला आहे. कंपनीने जबरदस्त फीचर्स असलेले तीन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. इन्फिनिक्स नोट 10 (Infinix Note 10), नोट 10 प्रो (Infinix Note 10 Pro) आणि नोट 10 प्रो NFC ((Infinix Note 10 Pro NGC) अशी या तिन्ही स्मार्टफोन्सची नावं आहेत. इन्फिनिक्स नोट 10 ची किंमत 14,713 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत बेस व्हेरिएंटसाठी आहे. त्याचबरोबर नोट प्रो ची किंमत 19,127 रुपये इतकी आहे. दरम्यान कंपनीने एनएफसी व्हेरिएंटच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. (Infinix Note 10, Note 10 Pro, Note 10 Pro NFC launched, check Price and specifications)

नोट 10 आणि नोट 10 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच बाजारात उपलब्ध करुन देण्यात येतील. तथापि, हे स्मार्टफोन भारतात कधी लाँच केले जाणार आहेत? याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. या फोनच्या फीचर्सविषयी सांगायचे झाल्यास इन्फिनिक्स नोट 10 मध्ये 6.95 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1500 : 1 च्या कॉन्ट्रास्ट रेशोसह येतो. यात आपणास मीडियाटेक हेलिओ जी 85 प्रोसेसर मिळेल जो Mali-G52 MC2 GPU सह येतो. डिव्हाइसमध्ये 4 जीबी / 6 जीबी रॅम पर्याय आणि 64 जीबी / 128 जीबी इंटर्नल स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे.

इन्फिनिक्स नोट 10 प्रो, नोट 10 प्रो NFC चे फीचर्स

दोन्ही स्मार्टफोनमध्ये सारखेच फीचर्स देण्यात आले आहेत, यामध्ये केवळ NFC चा फरक आहे. इन्फिनिक्स नोट 10 प्रो मध्ये 6.95 इंचाचा LCD डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो, यामध्ये आपल्याला मीडियाटेक हेलिओ G95 SoC मिळेल. फोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅम तसेच 128 जीबी आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज पर्यायासह येतो. डिव्हाइस Google Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतं, फोनची बॅटरी 5000mAh इतकी आहे. हा फोन 33W X चार्ज टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात आला आहे.

शानदार कॅमेरा

डिव्हाइसमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, तर फोनच्या रियर पॅनेलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो डीप सेन्सर देण्यात आला आहे. त्याच वेळी फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Realme च्या ‘या’ 5G स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, 5000mAh बॅटरी, 8GB/128GB सह ढासू फीचर्स

बहुप्रतीक्षित Redmi Note 10S आणि Redmi Watch बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

तब्बल 7 इंचांचा डिस्प्ले, 6000mAh बॅटरी, दमदार कॅमेरा आणि खूपच कमी, मेड इन इंडिया फोनची सर्वत्र चर्चा

(Infinix Note 10, Note 10 Pro, Note 10 Pro NFC launched, check Price and specifications)