AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | एवढ्या ‘एका कारणामुळे’ इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय

ध्या इस्त्रायलने थेट वृत्तवाहीन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य करुन त्यांच्यावर थेट मिसाईल्स डागल्या आहेत. (Israel destroyed AP AND Al Jazeera offices)

Video | एवढ्या 'एका कारणामुळे' इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय
Israel attack on Associated
| Updated on: May 16, 2021 | 12:51 AM
Share

Israel Palestine Conflict | इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे. मात्र, अजूनही तेथील वातावरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये. गाझा येथून रोज वेगवगेळ्या घटना समोर येत आहेत. सध्या इस्त्रायलने थेट वृत्तवाहीन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य करुन त्यांच्यावर थेट मिसाईल्स डागल्या आहेत. इस्त्रायलच्या या हल्ल्यामध्ये यूएसची एपी म्हणजेच असोसिएटेड प्रेस ( Associated Press) आणि कतारची अल जजीरा (Al Jazeera) यांचे गाझा येथे असलेली कार्यालये उद्ध्वस्त झाली आहेत. या एका घटनेमुळे इस्त्रायलवर जगभरातून टीका होतेय. (Israel destroyed U.S based Associated Press Al Jazeera and other news media offices on Saturday )

वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयांवर मिसाईल्स डागल्या

सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टिनींमध्ये टोकाचा संघर्ष सुरु आहे. इस्त्रालयकडून गाझा या भागात मोठ्या मिसाईल्स डागल्या जात आहेत. शनिवारीसुद्धा (15 मे) इस्त्रायलकडून अशाच प्रकारे गाझा भागात हल्ले केले गेले. मात्र, शनिवारी इस्त्रायलने मिसाईलद्वारे चक्क प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांना लक्ष्य केलं. इस्त्रायलच्या या हल्ल्यात एपी आणि अल जजीराची कार्यालये उद्ध्वस्त झाली. यामध्ये प्रसारमाध्यमांच्या कार्यालयासोबतच अन्य कार्यालये आणि काही अपार्टमेंट्ससुद्धा उद्ध्वस्त झाले. हल्ला करण्यापूर्वी इस्त्रायलच्या सैनिकांनी हा भाग खाली करण्याची सूचना प्रसारमाध्यमे तसेच इतरांना दिल्या होत्या. त्यानंतर येथील पत्रकारांनी त्यांचे कार्यालय खाली केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पाहा इस्त्रायलने माध्यमांच्या इमारतीवर केलेला हल्ला

इस्त्रायलवर जगभरातून टीका 

इस्त्रायलने माध्यमांच्या कार्यालयावर हल्ला केल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर टीका केली जातेय. असोसिएटेड प्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुद्धा यावर भाष्य केले आहे. ” इस्त्रायलने गाझा येथे असोसिएटेड प्रेस आणि इतर माध्यमांच्या कार्यालयांवर हल्ला केला हे ऐकून मला धक्का बसला. सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये जे सुरु आहे, त्यापेक्षा माध्यमांवर झालेला हा हल्ला जगाला भविष्यात दिसत राहील,” अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच अमेरिकी सरकारनेसुद्धा या घटनेची दखल घेत भाष्य केलं आहे. “सध्या जे काही सुरु आहे, यामध्ये पत्रकारांच्या सुरक्षेबद्दल आम्ही याधीच इस्त्रायलला कळवलेले आहे. आम्ही इस्त्रायलशी थेट संवाद साधला आहे. यावेळी स्वतंत्र पत्रकारिता आणि पत्रकारांची सुरक्षा याला इस्त्रायलने महत्त्व द्यायला हवे, असे आम्ही सांगितले आहे,” असे अमेरिकन व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी (Jen Psaki) यांनी ट्विट करत सांगितले.

या कार्यालयांमध्ये हमासचे लष्करी सामान

दरम्यान, इस्त्रायलने त्यांच्या सैन्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी या इमारतींवर हल्ला करण्याआधीच त्या खाली करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानंतर या ईमारतींवर हल्ला करण्यात आला, असा दावा केला. तसेच आम्ही माध्यमांची कोणतीही मुस्कटदाबी करत नाहीयेत, असं इस्त्रायली सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कॉर्निकस (Lieutenant Colonel Jonathan Conricus ) यांनी स्पष्टीकरण दिलं. सोबतच उद्ध्वस्त करण्यात आलेल्या इमारतींमध्ये हमास या संघटनेचे लष्करी साहित्य होते, असा दावासुद्धा इस्त्रायली सैन्याने केला आहे.

इतर बातम्या :

कोरोना महामारीत युद्धाचे ढग, जाणून घ्या इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्षाची कहाणी

इस्राईलने सीमेवर हजारो सैनिक पाठवले, गाजावर शेकडो हवाई हल्ले, हिंसा थांबणार की युद्ध पेटणार?

Israel Palestine Conflict | इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे चर्चेत आलेलं हमास नेमकं काय?

(Israel destroyed U.S based Associated Press Al Jazeera and other news media offices on Saturday )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.