भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) एक भरती अधिसूचना जारी केली आहे, ज्यात कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant Group ‘B’ NonGazetted) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 18 जून 2022 रोजी नोंदणी प्रक्रिया सुरू झालीये. एकूण 210 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. अधिकृत अधिसूचनेत असे म्हटलंय की, “रिक्त जागांची संख्या तात्पुरती आहे आणि प्रशासकीय कारणांमुळे ती संख्या बदलण्याचे, त्यात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.” इच्छुक उमेदवार न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू. 10 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्सच्या लेव्हल 6 मध्ये सुरुवातीचे बेसिक पे रु. 35,400/- एचआरएसह भत्त्यांच्या सध्याच्या दरानुसार अंदाजे ग्रॉस सॅलरी रु. 63068/- प्रतिमहिना (प्री-रिवाइज्ड पे स्केल पीबी-2 सह ग्रेड पे 4200/- रुपये)
पात्र उमेदवारांनी 18 जून 2022 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून www.sci.gov.in ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.