रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधूनच होणार उमेदवाराची निवड
नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी चालून आलीये. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. लगेचच उमेदवाराने या भरतीच्या तयारीला लागावे.

मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. उमेदवाराची निवड ही थेट मुलाखतीमधूनच होणार आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे. ही भरती प्रक्रिया रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचे शिक्षण झाले, ते थेट रेल्वे विभागात नोकरी करू शकतात.
ही भरती प्रक्रिया जगजीवनराम हॉस्पिटल पश्चिम रेल्वे, मुंबई यांच्यातर्फे राबवली जातंय. ही भरती एकून नऊ रिक्त पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून डॉक्टरची पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही पद्धतीचा अर्ज वगैरे करण्याची अजिबातच गरज नाहीये. थेट मुलाखतीसाठी तुम्हाला उपस्थित राहवे लागणार आहे.
15 जानेवारी 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या पार पडणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे जास्तीत जास्त 45 असावे. 45 पेक्षा अधिक वय हे उमेदवाराचे नसावे. नोकरीचे ठिकाण हे मुंबईच असणार आहे. चला तर मग इच्छुकांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला फटाफट लागावे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला जगजीवनराम रुग्णालय, सातवा मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई येथे उपस्थित राहवे लागणार आहे. तसेच उमेदवाराला येताना आपली महत्वाची कागदपत्रे ही सोबत आणावी लागणार आहेत. उमेदवाराला या भरती प्रक्रियेसाठी सकाळी 9 पर्यंत उपस्थित राहवे लागेल. दुपारी 12 नंतर आलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीये.
उमेदवारांनी या भरती प्रक्रियेच्या मुलाखतीला येण्याच्या अगोदर हे लक्षात घ्यावे की, आपण नेमकी कोणत्या पदासाठी मुलाखत ही देत आहोत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 15 जानेवारी 2024 रोजी मुलाखतीसाठी कागदपत्रांसह उपस्थित राहवे लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे.
