AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू

सरकारी नोकरी करण्याचे जवळपास सर्वांचेच स्वप्न असते. मात्र, कोणत्या विभागात कधी जागा निघत आहेत हेच अनेकांना कळत नाही. यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न राहूनच जाते. सध्या मोठी बंपर भरती सुरू आहे. ही भरती तब्बल 355 जागांसाठी होत आहे. मग उशीर कशाला करत आहात? आजच करा अर्ज

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी मोठी बंपर भरती प्रक्रिया सुरू
| Updated on: Nov 26, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : जर तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. तब्बल 355 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालीये. मग उशीर कशासाठी करत आहात? आजच करा अर्ज आणि मिळवा थेट सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी. ओडिशा फॉरेस्ट डेव्हलपमेंट विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. ओडिशा फॉरेस्ट डेव्हलपमेंट विभागात ही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे आपण देशाच्या कोणत्याही कोनाकोपऱ्यात बसून ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी सहज अर्ज करू शकता. खास गोष्ट म्हणजे भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे.

फील्ड असिस्टंटसह विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. 12 डिसेंबर 2023 पर्यंत आपण या पदांसाठी सहज अर्ज करू शकता. odishafdc.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि आजच आपला अर्ज करा. या साईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती मिळेल. आपल्याला नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे हे अगोदर निश्चित करा. त्याच्या अटी देखील व्यवस्थितपणे वाचा.

ही भरती प्रक्रिया एकून 355 पदांसाठी सुरू आहे. यामध्ये विविध पदे आहेत. लेखा असिस्टंट श्रेणी 2 ची 9 पदे, असिस्टंट श्रेणी 3 ची 61 पदे, कार्यकारी असिस्टंटची 13 पदे, विभागीय पर्यवेक्षक श्रेणी 2 ची 47 पदे, फील्ड असिस्टंट 47 पदे आणि फील्ड असिस्टंट ग्रेड 3 ची एकून 225 पदांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे. ही मोठी बंपर भरती असणार आहे.

फील्ड असिस्टंट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे. त्याशिवाय अर्ज करता येणार नाहीये. बाकी इतर सर्व पदांसाठी संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला वयाची एक अट आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे 21 ते 38 वर्षे असायला हवे.

फक्त राखीव प्रवर्गातील उमेदवारांना यामध्ये काही सुट देण्यात आलीये. 500 रूपये फिस या भरती प्रक्रियेसाठी लागणार असून राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 फिस आकारण्यात आलीये. या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक घेतले जाईल. लेखी परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवार हा प्रात्यक्षिकासाठी पात्र ठरेल. परीक्षेच्या अर्जानंतर उमेदवारांना हॉल तिकीट दिले जाणार आहे.

'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.