सरकारी नोकरीची संधी! रेल्वेत 6 हजार जागांसाठी भरती, पगार किती, कुठे करायचा अर्ज? वाचा…
रेल्वेत 6 हजारांपेक्षा जास्त जागांसाठी भरती निघाली आहे. RRB कडून टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेत 6 हजारांपेक्षा जास्त जागांसाठी भरती निघाली आहे. RRB कडून टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड-III पदांसाठी ऑनलाइन अर्ज अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रता काय आहे? अर्ज कुठे करायचा? पगार किती आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
किती जागांसाठी भरती होणार? अर्ज कुठे करायचा?
RRB द्वारे घेतल्या जाणाऱ्या भरतीअंतर्गत 6238 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 28 जुलै 2025 ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. तसेच अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30 जुलै आहे. तसेच 1 ऑगस्ट 10 ऑगस्ट पर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.
वयोमर्यादा किती?
टेक्निशियन ग्रेड-I सिग्नल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 33 वर्षे असावे, तसेच टेक्निशियन ग्रेड-III पदासाठी उमेदवारांचे वय 18-30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे.
अर्ज शुल्क किती?
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये आहे. तर एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईबीसी) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे. ग्रेड 1 पदांसाठी बीएस्सी पात्रता आवश्यक आहे. तर ग्रेड 3 पदांसाठी दहावी पास आणि आयटीआय अशी पात्रता आहे.
परीक्षेचे स्वरूप कसे असेल?
टेक्निशियन पदांसाठी होणाऱ्या या भरतीत 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवावे लागणार आहेत. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ⅓ गुण कापले जाणार आहेत. टेक्निशियन ग्रेड 1 साठी 29200 रुपये मुळ वेतन असणार आहे, तर टेक्निशियन ग्रेड 3 साठी मुळे वेतन 19,900 रुपये असणार आहे.
