AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, आजच करा अर्ज, सरकारी नोकरी करण्याची हीच ती संधी..

State Bank of India Recruitment Process : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागेल. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मेगा भरती, आजच करा अर्ज, सरकारी नोकरी करण्याची हीच ती संधी..
State Bank of India
| Updated on: Aug 18, 2025 | 12:08 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली असून अर्ज करण्याची शेवटी तारीख 26 ऑगस्ट आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज करावे लागतील. अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करा, सरकारी नोकरी करण्याची यापेक्षा दुसरी कोणती मोठी संधी असू शकत नाही. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. 6589 पदांसाठी भरती सुरू आहे. या भरतीतून प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची पदे भरली जातील.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची आहेत. sbi.co.in या साईटवर जाऊन अर्ज करता येतील आणि इथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरतीसाठी शिक्षणाची अट लागू करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 20 ते 28 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सरकारी नियमानुसार थोडी शिथिलता देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एक परीक्षा द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेत पास झालेले उमेदवारच पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरतील. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 750 रूपये फीस ही भरावी लागेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला काही कागदपत्रांची पुर्तता कारावी लागणार आहे. ज्यावेळी तुम्ही भरतीसाठी अर्ज करत आहात, त्यावेळी ती कागदपत्रे अपलोड करा.

थेट सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पदवीधरांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावा. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 ऑगस्ट 2025 आहे अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. अजिबात वेळ न घालता फटाफट अर्ज करा. मागील काही दिवसांपासून अनेक बॅंकांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामध्येच आता स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष