Akola DCC Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्याकडून बँकेसाठी कनिष्ठ लिपीक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 100 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे.

Akola DCC Bank Recruitment 2021: अकोला जिल्हा बँकेत क्लार्क पदांवर भरती, पदवीधरांना सुवर्णसंधी
अकोला

अकोला: अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अकोला यांच्याकडून बँकेसाठी कनिष्ठ लिपीक पदावर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. बँकेतर्फे एकूण 100 जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. सरळसेवा पद्धतीनं ही भरती प्रक्रिया होणार आहे.

पात्रता

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित अकोला मधील कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारानं कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर उमेदवारानं एमएससीआयटी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेने किमान 90 दिवसांचा संगणक प्रमाणपत्र प्राप्त केलेलं असणं आवश्यक आहे. तर, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचं वय 21-30 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

किती पदांसाठी भरती

अकोला जिल्हा बँकेने एकूण 100 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. पदांची संख्या कमी किंवा जास्त ठेवण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा 4 सप्टेंबर हा अखेरचा दिवस आहे. तर, अर्जाचं शुल्क देखील 4 सप्टेंबरपर्यंत जमा करावं लागणार आहे. ऑनलाईन परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल, असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. परीक्षा देखील सप्टेंबर महिन्यात घेण्यात येईल.

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम

कनिष्ट लिपीक पदासाठी 150 गुणांची ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. बँकिंग व सहकार, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी भाषा ज्ञान, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी यावर प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेसाठी अडिच तासांचा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. चुकीच्या उत्तरांसाठी गूण कापले जाणार आहेत. परीक्षा फक्त इंग्रजी भाषेत घेतली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा अमरावती, यवतमाळ, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल.

मुलाखत

ऑनलाईन परीक्षेत ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. लेखी परीक्षेतील गुणांना 75 टक्के ग्राह्य धरल जाईल तर 25 टक्के गुण मुलाखतीसाठी दिली जातील. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 50 टक्के गुण मिळवणं आश्यक आहे.

ऑनलाईन परीक्षा शुल्क

अकोला जिल्हा बँकेच्या ऑनलाईन परीक्षेसाठी 1000 रुपयांचं शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरावं लागणार आहे. हे शुल्क 4 सप्टेंबरपर्यंत भरता येईल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रोबेशन कालावधीमध्ये 10 हजार तर प्रोबेशन पूर्ण केल्यानंतर 25 हजार रुपये मासिक वेतन दिलं जातं.

अर्ज कुठे सादर करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.akoladccbank.com या वेबसाईटला भेट द्यावी.

इतर बातम्या :

NIOT Recruitment 2021: राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेत 237 पदांवर भरती,78 हजारांपर्यंत पगाराची संधी

PGCIL Recruitment 2021: पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये इंजिनिअर्सना मोठी संधी, 1 लाखांपर्यंत पगार मिळणार

The Akola District Central Cooperative Bank Ltd Akola invites online applications for the Post of Jr Clerk of the bank

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI