NEET UG 2021 | नीट यूजी परीक्षेची तारीख लवकरच होणार जाहीर, या वर्षी एकदाच होणार परीक्षा

prajwal dhage

|

Updated on: Mar 11, 2021 | 6:27 PM

नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) एमबीबीएस आणि बीडीएससह विविध पदवीधर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. The date of UG exam will be announced soon, the exam will be held only once this year)

NEET UG 2021 | नीट यूजी परीक्षेची तारीख लवकरच होणार जाहीर, या वर्षी एकदाच होणार परीक्षा
नीट पोस्ट ग्रेजुएशन परीक्षेची तारीख ठरली
Follow us

नवी दिल्ली : देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test) म्हणजेच नीट युजी 2021 (NEET UG 2021) परीक्षेची तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे. यावेळी ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे डायरेक्टर जनरल विनीत जोशी यांनी मीडिया अहवालात ही माहिती दिली आहे. (The date of UG exam will be announced soon, the exam will be held only once this year)

या वर्षी एकदाच होणार परीक्षा

नीट यूजी परीक्षा यावर्षी दोन वेळा घेण्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता, परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय वर्षातून दोनदा नीट यूजी परीक्षा 2021 घेण्यास अनुकूल नाही. नीट यूजी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज भरला गेल्यानंतर उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू शकतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सी(एनटीए) एमबीबीएस आणि बीडीएससह विविध पदवीधर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षी नीट यूजी परीक्षेत 15 लाखांहून अधिक उमेदवारांनी सहभाग घेतला होता.

नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी

नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा. यानंतर उमेदवारांनी प्रथम होम पेजवर जाणे आवश्यक आहे. यानंतर नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. यानंतर अधिसूचनेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. यानंतर आयडीची रजिस्टर्ज बनवा आणि पुन्हा लॉग इन विभागात जा. मग आपल्या क्रेडेन्शियल्समध्ये की आणि लॉग इन करा. अॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्ले स्क्रीनवर दिसेल. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा. या दस्तऐवजांचे प्रिंटआउट घ्या.

11 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा

या वर्षीपासून नीट युजी परीक्षा 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल. (The date of UG exam will be announced soon, the exam will be held only once this year)

इतर बातम्या

EXCLUSIVE : पळपुटेपणा नको, मुलांचं वय वाया गेलं, संधी हुकली तर जबाबदार कोण, MPSC परीक्षा आताच घ्या : देवेंद्र फडणवीस

Axis Bank ची कोट्यवधी ग्राहकांसाठी जबरदस्त सुविधा; ‘या’ उपकरणाद्वारे झटपट पैशांचे व्यवहार होणार

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI