Railway Recruitment: झुक झुक आगीनगाडी, भरती घेऊन आली आगीनगाडी! पटकन बातमी वाचूया, पटकन अर्ज भरूया

या पदासाठी अर्ज करायची पद्धत ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन अर्ज करू शकतात. 1 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 जून 2022 पर्यंत चालणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

Railway Recruitment: झुक झुक आगीनगाडी, भरती घेऊन आली आगीनगाडी! पटकन बातमी वाचूया, पटकन अर्ज भरूया
रेल्वेच्याही स्पेशल ट्रेन, ट्रेन कुठे कुठे थांबेल वाचा ...Image Credit source: ट्विटर - @KonkanRailway
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 12:35 PM

नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेने (North East Frontier Railway) अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice) भरती जाहीर केली आहे. एकूण 5636 पदांसाठी ही भरतीप्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. या पदासाठी अर्ज करायची पद्धत ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज ऑनलाईन अर्ज करू शकतात. 1 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती 30 जून 2022 पर्यंत चालणार आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. ही निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. दहावी परीक्षा पास किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा पद्धतीखालील) परीक्षा किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तेही मान्यताप्राप्त मंडळातून. शिवाय आयटीआयची पदवी असणंही आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. या पदासाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 24 असावे.

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा पद्धतीखालील) किमान 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त मंडळातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • आयटीआयची पदवी (ITI Degree) असणेही आवश्यक आहे

वयोमर्यादा

उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

ही निवड तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे. प्रत्येक युनिटमधील गुणवत्ता यादी त्या ट्रेडमधील मॅट्रिक + आयटीआयच्या गुणांमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल. ज्यात अप्रेंटिसशिप करायची आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचे

  • रिक्त पदे – 5636 पदं
  • अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन
  • अर्ज करायची मुदत – 1 जून ते 30 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – nfr.indianrailways.gov.in

अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या nfr.indianrailways.gov.in
  2. ‘एनएफआर रिक्रुटमेंट 2022’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
  3. आवश्यक ती माहिती भरा आणि नमूद केलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  4. नोंदणी फॉर्म एकदा तपासून सबमिट करा
  5. पुढील वापरासाठी अर्ज सेव्ह करून याची प्रिंट काढा आणि तुमच्या जवळ ठेवा

टीप: कृपया अधिकृत माहितीसाठी आणि अधिक माहितीसाठी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.