Government Job : या आहेत भारतातील सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या, पगार तब्बल…
Best Government Job : देशातील लाखो तरूण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. मात्र स्पर्धा जास्त असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. आज आपण स्पर्धा कमी आणि पगार जास्त असलेल्या सरकारी नोकऱ्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

सरकारी नोकरी मिळवण्याचे देशातील लाखो तरूणांचे स्वप्न असते. अनेकजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. तुम्हीला युपीएससी तर्फे निवडल्या जाणाऱ्या आयएएस, आयपीएस अशा नोकऱ्यांबाबत नक्कीच माहिती असेल, मात्र या नोकऱ्यांसाठी स्पर्धाही खूप जास्त असते. त्यामुळे अभ्यास करुनही अनेकांना अपयश येते. तुम्हालाही सरकारी नोकरी मिळवायची असेल, मात्र स्पर्धा कमी असावी असे वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा नोकऱ्यांची माहिती देणार आहोत. या अशा नोकऱ्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला आयएएस किंवा ग्रुप ए अधिकाऱ्यांच्या दर्जाचा पगार आणि भत्ते मिळतील.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला पदवीधर ही किमान पात्रता आवश्यक असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवार अर्ज करतात. मात्र आज आम्ही ज्या पदांची माहिती सांगणार आहोत ती पदे विशेष सरकारी संस्था, तांत्रिक विभाग किंवा नियामक संस्थांमध्ये असतात. यात एक लाखांपेक्षा जास्त पगार मिळतो, तसेच तुम्हाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ही देतात. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
RBI ग्रेड B अधिकारी
आरबीआयमधील ग्रेड बी अधिकारी हे खूप महत्त्वाचे पद आहे. या अधिकाऱ्यांचे वेतन आणि भत्ते IAS अधिकाऱ्यांच्या तुलनेत आहेत. हे अधिकारी देशाच्या चलनविषयक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावतात.
SEBI ग्रेड A अधिकारी
SEBI द्वारे भारतातील शेअर बाजारावर नियंत्रण ठेवले जाते. SEBI ग्रेड A अधिकाऱ्याचा दरमहा 1.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पगार मिळतो. या नोकरीसाठी कमी स्पर्धा असते.
ISRO/DRDO शास्त्रज्ञ/इंजिनिअर
इस्रो किंवी डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ आणि अभियंते भारताच्या अवकाश आणि संरक्षण कार्यक्रमांमध्ये योगदान देतात. या नोकरदारांना खूप जास्त पगार मिळतो.
IFS अधिकारी (भारतीय वन सेवा)
UPSC CSE परीक्षेद्वारे हे पद भरले जात नाही. आयएफएस अधिकारी ही ग्रुप ‘अ’ गटातील नोकरी आहे. या अधिकाऱ्यांना आयएएस/आयपीएस सारखेच वेतन, कॅडर आणि फायदे मिळतात.
ईएसआयसी/ईपीएफओ सहाय्यक संचालक
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मधील सहाय्यक संचालक ही मोठी पोस्ट आहे, यातही चांगले वेतन मिळते.
SIDBI/नाबार्ड ग्रेड ए अधिकारी
लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया (एसआयडीबी) आणि नाबार्ड या संस्थांमधील ग्रेड ए अधिकाऱ्यांना मोठे अधिकार असतात. त्यामुळे त्यांना चांगले वेतन मिळते.
पेटंट आणि डिझाइन परीक्षक
पेटंट आणि डिझाइन परीक्षक हे पद Intellectual Property कायद्यांतर्गत येते. या पदांसाठी खूप कमी अर्ज येतात, मात्र या नोकरीसाठी भरघोस पगार मिळतो.
