AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC नागरी सेवा 2022 मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका जारी, डाउनलोड करा

UPSCने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16, 17, 18,24 आणि 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात.

UPSC नागरी सेवा 2022 मुख्य परीक्षेची प्रश्नपत्रिका जारी, डाउनलोड करा
UPSC CSEImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 21, 2022 | 11:07 AM
Share

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार यूपीएससी – upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पेपर डाऊनलोड करू शकतात. या रिक्त जागेसाठी परीक्षा सुरू आहेत. 16 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. दरम्यान यूपीएससी सीएसई 2022 (UPSC CSE 2022) परीक्षांचा 16 आणि 17 सप्टेंबर रोजी होणारा पेपर जाहीर झालाय. यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16, 17, 18,24 आणि 25 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणारे उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रश्नपत्रिका डाउनलोड (Question Paper Download) करू शकतात.

UPSC CSE प्रश्नपत्रिका

  • या अधिकृत संकेतस्थळावर जा- upsc.gov.in
  • वेबसाइटच्या होम पेजवर Examination वर क्लिक करा.
  • यानंतर, Civil Services (Main) Examination, 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता Document: Question Paper या पर्यायावर जा.
  • यानंतर General Studies च्या पेपर कोडच्या लिंकवर जा.
  • प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपात उघडेल.
  • पेपरची प्रिंट घ्या

यूपीएससी नागरी सेवांवर आधारित भरती प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखती या तीन टप्प्यांमध्ये आयोजित केल्या जातात.

जे उमेदवार सीएसई मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे यूपीएससी नंतर नागरी सेवांचा निकाल जाहीर करते.

UPSC नागरी सेवा मुख्य प्रश्नपत्रिका 2022 जारी – थेट लिंक

त्यानंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना आयएएस, आयएफएस, आयआरएस, आयपीएस आणि इतर प्रीमियम सरकारी पदांवर नियुक्त केले जाते.

यूपीएससीने मुलाखतीचे वेळापत्रक आणि यूपीएससी नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर करण्याची वेळ आणि तारीख जाहीर केलेली नाही.

संघ लोकसेवा आयोगाकडून General Studies चा पेपर जाहीर करण्यात आलाय. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये General Studiesच्या पेपरचे चार संच जाहीर झाले आहेत. उमेदवार थेट वेबसाइटवरून पेपर डाउनलोड करू शकतात.

या परीक्षेत निबंधाचे 8 विषय दोन विभागात विभागले गेले होते, त्यापैकी उमेदवारांना प्रत्येकी एक निवडताना 3 तासांत दोन विषयांवर लिहिण्यास सांगण्यात आले. उमेदवारांना प्रत्येक निबंधासाठी सुमारे 1000-1200 शब्दात उत्तरे द्यावी लागत होती. उमेदवारांना वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Follow Us
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ...
कुठलं काय, अरे... तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ....
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक...
सोनं, कपडे घेतले अन् मंडपात उभं राहायला नकार, PSI कडून मोठी फसवणूक....
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना...
ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंना....
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल
आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याची पोलिसांनी काढली हवा! शिरूरमध्ये पोल.
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.