AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवीच्या दर्शनासाठी चालले होते भाविक, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते, मंदिरापर्यंत पोहचण्याआधीच…

मध्य प्रदेशातील 17 भाविक राजस्थानमधील कैला मातेच्या दर्शनासाठी निघाले होते. चंबळ नदीच्या घाटातून पायी नदी ओलांडत होते. या दरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि बाविक मंदिरापर्यंत पोहचलेच नाहीत.

देवीच्या दर्शनासाठी चालले होते भाविक, मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते, मंदिरापर्यंत पोहचण्याआधीच...
पोहायला गेलेला 11 वर्षाचा मुलगा धरणात बुडालाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 18, 2023 | 3:20 PM
Share

करौली : राजस्थानमधील करौली जिल्ह्यात भाविकांसोबत मोठी दुर्घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. करौलीतील मंद्रयाल भागात चंबळ नदीत 17 भाविक बुडाल्याची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने तात्काळ बचावकार्य सुरु करत 10 भाविकांना सुखरुप बाहेर काढले आहे. दोघांचा मृतदेह सापडले असून, पाच जण बेपत्ता आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता भाविकांचा नदीत कसून शोध सुरू आहे.

मध्य प्रदेशातील 17 भाविक देवीच्या दर्शनासाठी चालले होते

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिलाड गावातील 17 भाविक शनिवारी सकाळी कैला मातेच्या दर्शनासाठी चालले होते. सर्व जण करौली जिल्ह्यातील मंद्रयाल भागातील रोंधई गावाजवळील चंबळ नदीच्या छोई घाटावरून पायी नदी ओलांडत होते. यादरम्यान अचानक ते खोल पाण्यात गेले आणि एकामागून एक बुडू लागले. यामुळे नदीघाटावर एकच आरडाओरडा सुरु झाला.

10 भाविकांना वाचवण्यास यश

नदीघाटावर भाविकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे गावकरी धावत आले. गावकऱ्यांनी 10 प्रवाशांना सुरक्षित किनार्‍यावर आणण्यात यश मिळवले. नंतर पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतरही गावकऱ्यांनी आपले बचावकार्य सुरुच ठेवले. नदीत शोध घेत असताना दोन भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. तर पाच भाविक अद्याप बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरु आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनही बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले आहे. रेस्क्यू टीम नदीत भाविकांचा शोध घेत आहे.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.