बँकेतील पैशांचा कर्मचाऱ्यांनी जुगार खेळला ? गुन्हा दाखल चौघांना अटक… कुठं घडलं हे?
नाशिकच्या ओझर येथे असलेल्या सिद्धिविनायक बँकेच्या बाबत मोठा घोटाळा समोर आला आहे, त्याबाबत ओझर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत असून एक जण फरार आहे.

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील सिद्धिविनायक बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 3 कोटी 33 लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओझर पोलीसांनी याप्रकरणी रोखपालासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. चार वर्षांपासून लेखापाल दिनेश शौचे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत 3 कोटी 33 लाख रुपयांची आपल्या अधिकाराचा गैरवापर दुसरीकडे वळविले होते. शौचे यांना याबाबत कुठलाही अधिकारी काहीही एक विचारणा करत नव्हता. त्यामुळे शौचे यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे अशीही चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एका संचालकाने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे कि नाही यावर चौकशी करून गुन्हा दाखल करू अशी भूमिका बँकेने घेतली होती. त्यामध्ये बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रोलेट या जुगारासाठी वापरल्याची ओरड देखील समोर आली होती.
नाशिकच्या ओझर येथे असलेल्या सिद्धिविनायक बँकेच्या बाबत मोठा घोटाळा समोर आला आहे, त्याबाबत ओझर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघे अटकेत असून एक जण फरार आहे.
बँकेचे लेखापाल दिनेश शौचे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत 3 कोटी 33 लाख रुपयांची रक्कम आपल्या अधिकाराचा गैरवापर दुसरीकडे वळविली होती. ही बाब बँकेच्या वर्तुळात आणि पोलिसांत गेल्याने त्यांनी या रकमेची जमावाजमव करण्यास सुरुवात केली होती.
सिद्धिविनायक बँकेचा घोटाळा खरंतर जुलै महिन्यामध्येच उघड झाला होता. त्यामुळे ओझरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली होती.
बँकेतील हा घोटाळा ऐकून ठेवीदार यांच्यामध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून अनेकांनी ठेवी काढून घेण्यासाठी चौकशी सुरू केल आहे. यावेळी बँकेकडून बँकेची स्थिती चांगली असून घाबरु नये असं आवाहन केलं आहे.
या प्रकरणात बँकेचे सीए तुषार पगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून तीन कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीवरून ओझर पोलिसांनी रोखपाल दिनेश शौचे, वृंदा शौचे, सचिन इंगळे, प्रवीण अहिरे, महेश शेळके, प्रमोद जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
