AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : वांद्रे येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, 8 जखमी

Bandra Cylinder Blast : मुंबईतील वांद्रे येथे एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आठ जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News : वांद्रे येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट,  8 जखमी
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Nov 18, 2023 | 10:30 AM
Share

मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील वांद्रे येथील गजधर रोड भागात एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन आठ जण जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी 6.15 च्या सुमारास हा स्फोट झाला. वांद्रे येथील गजाधर रोड परिसरात वन प्लस स्ट्रक्चर असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर स्फोटाच्या घटनेत घरातील आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , वांद्रे येथील गजधर रोडवर असलेल्या घरात शनिवार (18 नोव्हेंबर) सकाळच्या सुमारास सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे भीषण आग लागली. आगीमुळे घरातील तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर ठेवलेले इलेक्ट्रिक सामान, वायरिंग तसेच कपडे हे जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तताडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत घरातील आठ जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण आगीमुळे २५ ते ४० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर सर्जिकल वार्डमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशसाकडून देण्यात आली आहे. दरम्यान एका रुग्णाने रुग्णालयात दाखल होण्यासच नकार दर्शवला

जखमींची नावे :

1) निखिल दास, 53 वर्षे, 35% भाजला 2) राकेश शर्मा, 38 वर्षे, 40% भाजला 3) अँथनी थेंगल, 65 वर्षे, 30% भाजला 4) कालीचरण कानोजिया, 54 वर्षे, 25% टक्के भाजला 5) शान अली झाकीर अली सिद्दीकी, 31 वर्षे, 40% भाजला 6) समशेर, 50 वर्षे, गंभीर जखमी, सर्जिकल वॉर्डमध्ये दाखल 7) संगीता, 32 वर्षे, किरकोळ जखमी 8) सीता, 45 वर्षे, रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.